Corruption of Irrigation Scheme : पंतप्रधान पॅकेजसह सिंचन योजनांना भ्रष्टाचाराची वाळवी

PM Narendra Modi : शेतकरी हित सांगत कोट्यवधी रुपयांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करण्यात आले. हे पॅकेजही भ्रष्टाचाराने पोखरलेले असल्याने त्याचाही उपयोग आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला झाला नाही.
PM Modi
PM ModiAgrowon
Published on
Updated on

Yavatmal News : ‘सिंचन प्रकल्पांचे उद्‌घाटन करून मर्जीतील कंत्राटदारांचे हित जपण्यासाठी ते वर्षांनुवर्षे रखडत ठेवायचे, असे धोरण विदर्भातील सिंचन प्रकल्पांबाबत कॉंग्रेसच्या काळात राबविण्यात आले.

या प्रकल्पांना आमच्या सरकारने पूर्ण केले. त्यासह शेतकरी हित सांगत कोट्यवधी रुपयांचे पंतप्रधान पॅकेज जाहीर करण्यात आले. हे पॅकेजही भ्रष्टाचाराने पोखरलेले असल्याने त्याचाही उपयोग आत्महत्याग्रस्त जिल्ह्याला झाला नाही,’’ अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यवतमाळ येथे बुधवारी (ता. २८) केली.

यवतमाळनजीकच्या भारी येथे विविध योजनांचे लोकार्पण श्री. मोदी यांच्या हस्ते झाले. राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी, हंसराज अहीर उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे यांनी सुरवातीला पंतप्रधानांचे पारंपरिक बंजारा पगडी घालत तसेच संत ज्ञानेश्‍वर माऊलींची मुर्ती भेट देत स्वागत केले. पंतप्रधान मोदी यांनी भाषणाची सुरवात मराठीतून केली. यावेळी त्यांनी विरोधकांच्या भ्रष्ट धोरणांचा चांगलाच समाचार घेतला.

PM Modi
Purandar Irrigation Scheme : पुरंदर उपसा योजनेच्या पाणी वाटपाचे नियोजन जाहीर

श्री. मोदी म्हणाले, ‘‘देशात २०१४ पर्यंत १०० पैकी १५ परिवार असे होते की त्यांच्या घरात पाइपलाइनने पाणी येत होते. आज १०० पैकी ७० घरापर्यंत आम्ही पाणी पोचविण्यात यशस्वी झालो आहोत.

महाराष्ट्रात आज सव्वा कोटी नळजोड आहेत. यालाच मोदी गॅरंटी म्हणतात. कॉंग्रेसने स्वातंत्र्य काळापासून १०० सिंचन योजना रखडत ठेवल्या होत्या. त्यातील ६० पेक्षा अधिक पूर्ण झाल्या आहेत.

उर्वरित लवकरच पूर्ण होतील. या रखडलेल्या योजनांमध्ये महाराष्ट्रातील २६ सिंचन योजना होत्या. यातील १२ पूर्ण झाल्या. प्रलंबित सिंचन योजना लवकरच पूर्ण होतील. गोसेखुर्द प्रकल्पाचे काम आम्ही पूर्ण केले.

बळीराजा सिंचन योजना आणि पंतप्रधान सिंचन योजनेतून ९१ प्रकल्पांना निधी दिला.’’ ‘‘यापूर्वी सिंचन योजना मुद्दाम रखडत ठेवल्या जात होत्या. त्यावेळच्या सरकारच्या पापाचे फळ विदर्भ, मराठवाड्यातील नागरिकांना भोगावे लागले.

बारा बलुतेदारांच्या उत्कर्षासाठी विश्‍व‍कर्मा योजना आम्ही आणली. ऊसदरातही वाढ करून उत्पादकांचे अर्थकारण सक्षम व्हावे असा प्रयत्न आहे. शेतीमालाचे भाव दबावात असताना साठवणुकीची व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना शेतीमाल विकावा लागतो. त्यामुळे आमच्या सरकारने जगातील सर्वात मोठी गोदाम योजना आणली आहे.

या योजनेत गैरप्रकार होऊ नये यासाठी सहकारी संघामार्फत त्याची कार्यवाही करण्यात येणार आहे,’’ असेही पंतप्रधान म्हणाले. गरीब, युवक, शेतकरी तसेच महिला या चार घटकांचा उत्कर्ष आमच्या सरकारच्या अजेंड्यावर असल्याचेही त्यांनी सांगितले.

PM Modi
Mhaisal Irrigation Scheme : ‘म्हैसाळ’चे बिल टंचाई निधीतून

‘पीएम किसान’सह ‘नमो’चा हप्ता जमा

पंतप्रधान मत्स्य संपदा योजना, मुख्यमंत्री महिला सक्षमीकरण योजना, बळीराजा व पंतप्रधान सिंचन योजना, पंतप्रधान शेतकरी सन्मान योजनेचा १६ वा हप्ता तसेच नमो सन्मान योजनेचा दुसरा व तिसरा हप्ता, वर्धा-कळंब तसेच अमळनेर ते नवी आष्टी या नव्या रेल्वे मार्गावरील प्रवासी रेल्वेचे लोकार्पण या वेळी पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.

तत्कालीन केंद्रीय कृषिमंत्र्यांनी काय केले ?

‘‘केंद्रीय कृषिमंत्री महाराष्ट्राचे असताना त्यांच्या काळात घोषित पॅकेजचा लाभ महाराष्ट्राला किती झाला हा मोठा प्रश्‍न आहे. याउलट आम्ही थेट हस्तांतरण योजनेतून मध्यस्थांची साखळी दूर केली. आज एक बटण दाबताच २१ हजार कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या खात्यात हस्तांतरित झाले. याउलट कॉंग्रेसच्या काळात मात्र २१ हजार कोटींपैकी १८ हजार कोटी मध्यस्थांनीच मध्येच हडप केले असते’’, असा आरोप श्री. मोदी यांनी शरद पवार यांचे नाव न घेता केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com