Paddy Procurement : धानाच्या खरेदीत यंदा १५ लाख क्‍विंटल घट

Paddy Market : कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा हेक्‍टरी ४० क्‍विंटल धानाची उत्पादकता अपेक्षित होती. त्याआधारे हमीभाव केंद्राद्वारे ४० लाख क्‍विंटल धान खरेदी अपेक्षित असताना केवळ २४ लाख ७५ हजार क्‍विंटलच खरेदी होऊ शकली.
Paddy Procurement
Paddy Procurement Agrowon

Gondiya News : कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा हेक्‍टरी ४० क्‍विंटल धानाची उत्पादकता अपेक्षित होती. त्याआधारे हमीभाव केंद्राद्वारे ४० लाख क्‍विंटल धान खरेदी अपेक्षित असताना केवळ २४ लाख ७५ हजार क्‍विंटलच खरेदी होऊ शकली. गेल्यावर्षीच्या तुलनेत १५ लाख क्‍विंटलने ती कमी आहे.

धान उत्पादकांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, याकरिता शासनाकडून बाजारहस्तक्षेप योजना राबविली जाते. त्याअंतर्गत जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळामार्फत केंद्र उघडत धान खरेदीला प्राधान्य देण्यात येते. जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने खरीप हंगामात एकूण १८३ केंद्राद्वारे खरेदी केली. ८० हजार ७४० शेतकऱ्यांकडून २४ लाख ७५ हजार ५९५ क्‍विंटल धान फेडरेशनने खरेदी केला.

Paddy Procurement
Paddy Procurement : शासकीय धान खरेदीला ३१ पर्यंत मुदतवाढ

या धानाची किंमत ५४० कोटी रुपये आहे. यापैकी ५१३ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांना अदा केले आहेत. ३८१ शेतकऱ्यांचे १७ कोटी रुपये थकले आहेत. विशेष म्हणजे शासनाने धान खरेदीला दोनदा मुदतवाढ दिली. पण यानंतरही धान खरेदीला अपेक्षीत प्रतिसाद मिळाला नाही.

Paddy Procurement
Paddy Procurement : भातखरेदी केंद्रांवरील ऑनलाइन प्रणाली ठप्प

गेल्यावर्षी तब्बल ४० लाख क्‍विंटलची खरेदी झाली असताना यंदा केवळ २४ लाख ७५ हजार क्‍विंटलच धान खरेदी झाली. गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल १५ लाख क्‍विंटलची घट झाल्याने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांना धान विक्री केल्याची शक्‍यता आहे. खरीप हंगामात तब्बल दोन महिने उशिरा धान खरेदी केंद्रे सुरू झाल्याने याचा परिणाम खरेदीवर झाल्याची स्थिती आहे.

भरडाई रखडली

करारनाम्यातील तरतुदींना विरोध म्हणून राइस मिलर्संनी भरडाईसाठी धानाची उचल केली नाही. परिणामी, गेल्या चार महिन्यांपासून २४ लाख ७५ हजार क्‍विंटल धान उघड्यावरच पडून आहे.

धान खरेदी स्थिती

नोंदणीकृत शेतकरी : १,२५,१२९

धान विक्री केलेले शेतकरी : ८०७४०

धानाची रक्‍कम : ५४० कोटी

थकीत चुकारे : १७ कोटी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com