Farmers Protest : केंद्र सरकार पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांसोबत बैठकीस तयार; १२१ शेतकऱ्यांनी सोडलं उपोषण

Jagjeet Dallewal : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २६ नोव्हेंबरपासून उपोषण करणाऱ्या सत्तरवर्षीय जगजीत सिंग डल्लेवाल यांनी केंद्राच्या चर्चेच्या आमंत्रणानंतर वैद्यकीय उपचार घेण्याची तयारी दर्शविली.
Farmers Protest
Farmers Protestagrowon
Published on
Updated on

Farmers Protest Punjab and Haryana : पंजाब व हरियाणाच्या सीमेवर बेमुदत उपोषणाला बसलेल्या १२१ शेतकऱ्यांनी रविवारी (ता.१९) आपले उपोषण मागे घेतले. त्यांनी वैद्यकीय मदतही घेतली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी २६ नोव्हेंबरपासून उपोषण करणाऱ्या ७० वर्षीय जगजीत सिंग डल्लेवाल यांनी केंद्राच्या चर्चेच्या आमंत्रणानंतर वैद्यकीय उपचार घेण्याची तयारी दर्शविली. परंतु ते आपल्या उपोषणावर ठाम राहिले आहेत. फक्त वैद्यकीय उपचार स्विकारणार आहे, अन्नत्याग आंदोलनावर मी ठाम असल्याचे त्यांनी सांगितलं.

५० दिवसांहून अधिक काळ उपोषणास बसलेल्या शेतकरी नेते डल्लेवाल यांना विविध मागण्यांसाठी १४ फेब्रुवारीला चर्चेसाठी आमंत्रित केले. त्यानंतर डल्लेवाल यांनी वैद्यकीय मदत घेण्यास सहमती दर्शविली. डल्लेवाल यांची प्रकृती खालावत होती परंतु सरकार त्यांच्या मागण्या मान्य करण्यास तयार नव्हते. यावेळी डल्लेवाल यांच्यासोबत १११ शेतकऱ्यांनी १५ जानेवारी रोजी उपोषण सुरू केले. यानंतर १७ जानेवारी रोजी आणखी १० शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते.

यावर शेतकऱ्यांच्या दबावापोटी उपपोलिस महानिरीक्षक मनदीप सिंग सुद्धू आणि पटियालाचे पोलीस अधिक्षक नानक सिंग यांनी मध्यस्थी करत उपोषण मागे घेण्यास सांगितले. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे सहसचिव प्रिय रंजन यांच्या नेतृत्वाखालील उच्चस्तरीय पथकाने शनिवार (ता.१७) शेतकरी नेते डल्लेवाल आणि संयुक्त किसान मोर्चाच्या काही प्रतिनिधींची भेट घेतली. यानंतर चंदीगडमध्ये चर्चा करण्यासाठी आमंत्रित केले.

Farmers Protest
Onion Farmer Issue : केंद्राच्या अस्थिर धोरणाने कांद्याची चहूबाजूने कोंडी, शेतकऱ्यांची स्थिती गंभीर!

शेतकरी नेते काका सिंग कोटडा म्हणाले की, "संपूर्ण परिस्थिती लक्षात घेता, जगजीत सिंग डल्लेवाल यांच्यासाठी वैद्यकीय मदत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोठा विजय आहे असे आपण म्हणू शकत नाही, परंतु आपण एक पाऊल पुढे टाकले आहे असे म्हणू शकतो. केंद्रासोबत बैठक घेण्यात आम्हाला यश आले आणि चर्चेसाठी बंद दरवाजा उघडण्यात आम्हाला यश आले". असे कोटडा यांनी सांगितलं.

शेतकऱ्यांची पुढील योजना

शेतकरी नेते अभिमन्यू कोहाड म्हणाले की, अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना सांगितले की, २६ जानेवारी रोजी होणाऱ्या प्रजासत्ताक दिनाच्या तयारीसाठी मंत्री आणि अधिकाऱ्यांना नियुक्त करण्यात आले आहे. तर दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, ९ फेब्रुवारीपर्यंत आचारसंहिता लागू आहे. यानंतर बैठक घेणार होणार आहे. यासाठी १४ फेब्रुवारी हा दिवस ठरवण्यात आला आहे". असे कोहाड यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com