ZP School : कोल्हीतील ‘जि. प’ची शाळा जिथे, दोन्ही हातांनी लिहितात विद्यार्थी

एकाच वेळी दोन्ही हातांनी सारख्याच क्षमतेने काम करण्याचे कौशल्य या मुलांमध्ये नेमके कुठून आले, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही.
ZP School Kolhi
ZP School KolhiAgrowon

नंदोरी, जि. वर्धा ः तेरा वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘थ्री इडियटस’मधील विरू सहस्रबुद्धे (बोमन इराणी) (Boman Irani) आठवतात. एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहू शकणारा माणूस. सिनेमात काहीही होऊ शकते. पण तुम्हाला जर सांगितले, की एक शाळा अशी आहे, ज्या शाळेत शिकणाऱ्या मुलांना आपल्या दोन्हीही हातांनी अगदी व्यवस्थितपणे लिहिता (Writing Skill) येते, तर..! हे अविश्‍वसनीय वाटत असले तरी अगदी खरे आहे.

ZP School Kolhi
Akola ZP : राष्ट्रपतींच्या हस्ते अकोला जिल्हा परिषदेला पुरस्कार

या शाळेचे नाव आहे हिंगणघाट तालुक्यातील जि. प. प्राथमिक शाळा कोल्ही. हिंगणघाट शहरापासून ३५ किमी अंतरावर असलेल्या या शाळेचे वैशिष्ट्य असे, की शाळेत शिकणाऱ्या जवळपास ४८ विद्यार्थ्यांपैकी ३५ विद्यार्थ्यांना दोन्ही हातांनी सहजपणे मराठी, इंग्रजी लिहिता येते.

ZP School Kolhi
ZP Education : बंद पडणाऱ्या शाळेला उभारी

उर्वरित १३ विद्यार्थीदेखील हे कौशल्य आत्मसात करीत आहेत. यातील बहुतांश विद्यार्थी पारधी समाजातील आहेत. एकाच वेळी दोन्ही हातांनी सारख्याच क्षमतेने काम करण्याचे कौशल्य या मुलांमध्ये नेमके कुठून आले, असा प्रश्‍न पडल्याशिवाय राहत नाही.

या शाळेतील मुलांना अशा पद्धतीने विकसित करण्यामागे शाळेचे मुख्याध्यापक परमेश्‍वर नरवटे आणि शिक्षिका दीपाली सावंत यांची मोठी भूमिका आहे. सावंत यांच्या असे वाचनात आले, की भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद हे आपल्या दोन्ही हातांनी लिहायचे. हे समजल्यानंतर याच गोष्टीतून प्रेरणा घेत त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना अशाप्रकारे घडविण्याचा विडा उचलला आणि यात त्या यशस्वी झाल्या.

शाळेची विद्यार्थी संख्या

वर्ग पटसंख्या दोन्ही हातांनी लिहिणारे विद्यार्थी

१ ०५ ०२

२ १० ०४

३ १२ ११

४ ०९ ०९

५ १२ १२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com