ZP Education : बंद पडणाऱ्या शाळेला उभारी

दर्जेदार शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत नक्‍कीच विकास होतो, मग ती शाळा दुर्गम असो वा शहरी तसेच माध्यम इंग्रजी असो की मराठी, याचा फारसा फरक पडत नाही.
ZP Education : बंद पडणाऱ्या शाळेला उभारी
Published on
Updated on

महाड, जि. रायगड ः दर्जेदार शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत नक्‍कीच विकास होतो, मग ती शाळा (Education) दुर्गम असो वा शहरी तसेच माध्यम इंग्रजी असो की मराठी, याचा फारसा फरक पडत नाही. महाड तालुक्यातील वीर सुतारवाडी या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणाऱ्या संभाजी खोत (Sambhaji Khot) या शिक्षकाने हेच दाखवून दिले आहे. आदर्श पुरस्काराच्या मागे न धावता आपल्या कामातून शिक्षकाने बंद पडणाऱ्या शाळेची पटसंख्या वाढवून मुलांना व ग्रामस्थांनाही दिलासा दिला आहे.

ZP Education : बंद पडणाऱ्या शाळेला उभारी
Education Scholarship : शेतकऱ्याच्या मुलाला मिळाली १ कोटीची शिष्यवृत्ती

ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळाच शिक्षणाचा आधार आहेत. असे असतानाही सरकारने ५ पटसंख्या असलेल्‍या शाळा बंद करण्याचे धोरण स्वीकारले आहे. २०१९ मध्ये महाड तालुक्यातील वीर सुतारवाडी शाळेत केवळ ३ विद्यार्थी शिकत असल्याने ही शाळाही बंद पडण्याच्या मार्गावर होती. परंतु याठिकाणी संभाजी महिपती खोत या शिक्षकांची बदली झाली.

ZP Education : बंद पडणाऱ्या शाळेला उभारी
Education System : इंग्रजी शाळा शिकून घोटाळा...

कमी पटसंख्या पाहून त्यांनी शाळा वाचवण्याबरोबर विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची ग्वाही गावकऱ्यांना दिली. आणि केवळ ३ वर्षात शाळेची पटसंख्या २१ वर गेली आहे. नियमीत अभ्यासाबरोबर डिजिटल शिक्षणावर भर देण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रोजेक्टर बसवण्यात आला.

ZP Education : बंद पडणाऱ्या शाळेला उभारी
Education System : तुमी मॅडम कशाला झाल्या कायनू?

त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि सराव करून घेण्यावर भर दिला जातो. अवांतर वाचन, मानसिक खेळ, प्रेरणादायी गोष्टी, वन भोजनासारखे उपक्रम राबवले जात असून इंग्रजीच्या वापरामुळे मुलांमधील आत्‍मविश्‍वासही वाढला आहे. शाळेतील गुणवत्तापूर्ण आणि आनंददायी वातावरण पाहून अनेक पालकांनी पुन्हा वीर सुतारवाडी शाळेकडे वळले आहेत.

शाळा परिसर सजवला

१. खासगी शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांनीही पुन्हा प्राथमिक मराठी शाळेची वाट धरली आहे. खोत यांनी शाळेत विविध प्रयोग केले आहेत. मोडकळीस आलेली शाळेची इमारत त्‍यांनी ग्रामस्थांच्या मदतीने दुरुस्ती केली. शाळा परिसर स्वच्छ केला.

२. विविध प्रकारची झाडे, फुलांची रोपे लावून परिसर सजवला. शाळेच्या इमारतीची रंगरंगोटी केली. त्‍यामुळे विद्यार्थीही आनंदाने शाळेत येऊ लागले. आज शाळेतील विद्यार्थी इंग्रजी शाळेप्रमाणे गणवेश, टाय, पायात मोजे-बूट असा पेहराव करून रुबाबात वावरतात तोच नियम शिक्षकांनीही पाळायचा म्हणून शिक्षकही पांढरा शर्ट, टाय घालूनच शाळेत येतात.

वीर सुतारवाडी शाळेचे शिक्षक संभाजी खोत हे शाळेची शैक्षणिक गुणवत्ता वाढावी, यासाठी प्रयत्न करत आहेत.आपल्या कौशल्याने व प्रयत्नांने त्यांनी पटसंख्या वाढवून दर्जाही राखला आहे.
सुनीता पालकर, गट शिक्षण अधिकारी, महाड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com