Soybean : खरिपात पेरलेल्या सोयाबीनवर ‘यलो मोझॅक’ चा प्रादूर्भाव

गतवर्षी ऊस पीक घेतलेल्या शेतक-यांचे मोठे हाल झाले. शेतातील उभा ऊस शेतक-यांनी अठरा ते वीस महिने जोपासून मिळेल त्या भावात कोणत्याही कारखान्यांना देवून टाकला. यामध्ये शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
Soybean
SoybeanAgrowon
Published on
Updated on

शिराढोण, जि. उस्मानाबाद ः शिराढोण सह कळंब तालुक्यातील शेतक-यांनी या वर्षी खरीप हंगामात पेरलेल्या सोयाबीनवर (Soybean) यलो मोझॅक (Yellow Mosaic Outbreak On Soybean) नावाच्या विषाणूंचा प्रादूर्भाव दिसून येत असून यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मोठया प्रमाणात सोयाबीनची लागवड (Soybean Cultivation) केलेल्या शेतक-यांना हा विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी मोठया प्रमाणात महागड्या फवारणीचा खर्च वाढला असून खर्च करूनही या विषाणू पासून आपल्या शेतातील पिकात सुधारणा नाही. अतिवृष्टीच्या नुकसान भरपाई प्रमाणे शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. अशी मागणी होत आहे.

Soybean
Soybean Rate : सोयाबीनला यंदाही चांगला दर मिळणार

गतवर्षी ऊस पीक घेतलेल्या शेतक-यांचे मोठे हाल झाले. शेतातील उभा ऊस शेतक-यांनी अठरा ते वीस महिने जोपासून मिळेल त्या भावात कोणत्याही कारखान्यांना देवून टाकला. यामध्ये शेतक-यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या उसाच्या संकटातून सावरून शेतक-यांनी यावर्षी खरीप हंगामात सोयाबीन या पिकाची लागवड केली मात्र गेल्या काही दिवसांपासून नव्यानेच यलो मोझॅक नावाच्या विषाणूने शेतक-यांची झोपच उडवली.

Soybean
Soybean : हळद, मूग, सोयाबीनमध्ये उतरता कल

या यलो मोझॅक नावाच्या विषाणू मूळे सुरवातीला काही प्रमाणच सोयाबीनचे एखादे झाड पिवळे पडते व बघता बघता हा विषाणू पसरून संपूर्ण शेतातील सोयाबीनच्या संपूर्ण पीक पिवळे करून टाकतो. या विषाणू पासून पिकांना वाचवण्यासाठी सध्या शेतक-यांची धावपळ सूर आहे. महागड्या औषधांची फवारणी करून याला वाचवता येईल का? हा प्रश्न शेतक-यांच्या मनात सध्या आहे.

दहा एकरावर नांगर.

सोयाबीनवर पडणा-या या यलो मोझॅक नावाचा विषाणूने प्रादूर्भाव केलेल्या कळंब तालुक्यातील पाडोळी, एकूरका शिवारातील शेतकरी रामहरी घाडगे व गवळणबाई घाडगे या शेतक-यांनी आठ दिवसांपूर्वी आपल्या शेतातील सोयाबीनवर नांगर फिरवला.घाडगे यांनी पेरणी पासून ते आजपर्यंत नव्वद हजारांच्या वर या पिकासाठी खर्च केला होता परंतु यावर विषाणूंचा प्रादूर्भाव झाल्याने हे उभे पीक त्यांना मोडावे लागले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com