Yamuna River Flood : मुसळधार पावसामुळे दिल्लीत यमुना नदीला पूर

Yamuna River Flood Update : उत्तर भारतात सध्या पावसाने हाहाकार माजवलाय. हिमाचल प्रदेशत पावसाने उघडीप दिली असली तरी दिल्लीत जोरदार पाऊस सुरू आहे.
Delhi Flood
Delhi Flood Agrowon
Published on: 
Updated on: 

Yamuna Flood Update : उत्तर भारतात सध्या पावसाने हाहाकार माजवलाय. हिमाचल प्रदेशत पावसाने उघडीप दिली असली तरी दिल्लीत जोरदार पाऊस सुरू आहे. या जोरदार पावसामुळे यमुना नदीच्या पातळीत वाढ झाली असून नदीला पूर आला आहे. पुराचे पाणी सीमा ओलांडत शहराच्या विविध भागांमध्ये पोहोचले आहे. काश्मिरी गेट, आईटीओसारख्या भागांनंतर पाणी आता सिव्हील लाईन्सपर्यंत आले आहे.

यमुना नदीचा जलस्तर २०८.४६ मीटरने वाढला असून पाणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या सिव्हील लाईन्स येथील घराच्या अगदी जवळ आले आहे. या भागातील रस्ते पाण्याखाली गेले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या घराबरोबरच पाणी सचिवालयापर्यंत देखील पोहोचलंय. तिकडे, सनलाईट कॉलनीच्या भागात एका व्यक्तीचा पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला.

Delhi Flood
Delhi flood : दिल्ली बुडाली! एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं...

हथिनी कुंड बॅराजमधून पाणी सोडले गेल्याने यमुना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली. बुधवारी (ता. १२) पावसाचा ४५ वर्षांचा विक्रम तुटल्यानंतर यमुना नदीने दिल्लीमध्ये हाहाकाराचे संकेत दिले होते. गुरुवारी (ता. १३) सकाळपर्यंत पाण्याची पातळी २०८.४६ मीटरपर्यंत वाढली होती.

दिल्लीच्या अनेक भागांत घरांमध्ये पाणी घुसले. पुरामुळे अनेक रस्ते बंद करावे लागले असून हजारोच्या संख्येने लोक मदत शिबिरांमध्ये आले आहेत. मयुर फेज १, वजीराबाद, खजुरी आणि राजघाट यांसारख्या भागांमध्येही पुराचे पाणी घुसले. ४० वर्षीय मनोज सोमवारी सनलाईट कॉलनी भागातील मंडावली भागात भाजी विकण्यासाठी गेला होता. बुधवारी (ता. १३) त्याचा मृतदेह कालेखॉं भागातील यमुना नदीतून मिळाला.

Delhi Flood
Agriculture Success Story: फळबागेतून मिळवला आर्थिक नफा; शेतकऱ्याने प्रगती कशी साधली?

हिमाचलमध्ये उघडीप; बचावकार्याला वेग

सिमला ः हिमाचल प्रदेशात आठ ते दहा जुलै दरम्यान झालेल्या मुसळधार पावसामुळे येथील अनेक महामार्गांवर भूस्खनल झाले. त्याचप्रमाणे येथील नद्यांची पाणीपातळी वाढून अनेक ठिकाणी पाणी साचल्याने येथील अनेक भागांत पर्यटक अडकून पडले होते.

चंद्रताल येथे सुमारे तीनशे पर्यटक अडकून पडले होते. त्यांना हवाई मार्गाने चंद्रताल येथून परत आणण्यात आले मात्र, खराब हवामानामुळे इतर प्रवाशांची हावाईमार्गे सुटका करण्यासदेखील अडथळे निर्माण होत होते.

सोमवारपासून (ता. १०) पावसाने उघडीप दिल्याने येथील बचाव कार्याला वेग आला आहे. चंद्रताल येथे अडकलेल्यांना माघारी घेऊन येण्यासाठी यंत्रणा कार्यरत झाल्या असून गुरुवारी (ता. १३) दुपारी पर्यटकांची पहिली तुकडी चंद्रताल येथून निघाली.

त्यांना लोसार येथे आणण्यात येणार आहे. चित्कुल-रक्षम येथून ९५ पर्यटकांची सुटका करण्यात आली आहे. कुलू आणि मनाली येथून सुमारे २५ हजार पर्यटकांना सुरक्षितस्थळी आणण्यात आले आहे. लाहोल स्पिती येथे अडकलेल्या पर्यटकांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.