माणिक रासवे : अॅग्रोवन वृत्तसेवा
परभणी जिल्ह्यातील देवनांद्रा येथील संयुक्त थोरे कुटुंबाने फळबाग केंद्रित बहुविध पीक पद्धतीचा अवलंब करून शेतीतील जोखीम कमी करण्याबरोबर आर्थिक बाजू भक्कम केली आहे.
सिंचनाची शाश्वती, शेडनेट तंत्रज्ञान, सौर पंप आदी सुविधा व चोख व्यवस्थापनातून शेतीची उत्पादकता वाढविण्यात त्यांना यश आले आहे.
दहा वर्षांहून अधिक काळापासून उती संवर्धित रोपांची लागवड होते. खुल्या जागेसह शेडनेटमध्येही हे पीक आहे. त्याची पार्श्वभूमी म्हणजे एक एकराची दोन शेडनेट्स यापूर्वी उभारली. त्यातील एकात २०२० मध्ये खरबूज घेतले. मात्र लॉकडाउनमुळे विक्री व्यवस्था कोलमडली.
परभणी येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत असताना विजय यांना राज्य सीताफळ महासंघाचे अध्यक्ष श्याम गट्टाणी यांच्याकडून सीताफळ लागवडीबाबत मार्गदर्शन मिळाले.
त्यातून २०१३-१४ मध्ये बालानगर सीताफळाची हलक्या जमिनीवर सव्वा एकरांत १४ बाय ७ फूट अंतरावर लागवड केली.
सन २०१९-२० मध्ये सरदार (एल ४९) जातीच्या पेरूची अडीच एकर लागवड केली आहे. सीताफळ व पेरू या बागा हुंडी पद्धतीने व्यापाऱ्यांना दिल्या जातात. त्यातून एकूण तीन ते साडेतीन लाखांचे उत्पन्न मिळते.