Delhi flood : दिल्ली बुडाली! एका मिनिटात होत्याचं नव्हतं झालं...

Team Agrowon

दिल्लीत पूर

उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे देशाची राजधानी दिल्लीत पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Delhi flood | agrowon

यमुनेचे पाणी घरात

यमुना नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने सखल भागातील घरे पाण्यात बुडाली आहे.

Delhi flood | agrowon

रस्ते पाण्याखाली

हरियाणातून पाणी सोडण्यात आल्याने यमुना नदीचे पाणी रस्त्यावर आले आहे. रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे.

Delhi flood | agrowon

बचाव कार्य

निगम बोध घाट, बेला घाट, यमुना बाजार, गीता कॉलनी आदी भागातही यमुनेचे पाणी शिरले आहे. तेथून लोकांना बाहेर काढण्यात आले आहे.

Delhi flood | agrowon

मदत छावण्या

दिल्ली सरकारने मदत आणि बचाव कार्यासाठी मोठ्या प्रमाणात मदत छावण्या उभारल्या आहेत.

Delhi flood | agrowon

शाळा बंद

ज्या भागात पाणी साचले आहे त्या भागातील सर्व सरकारी आणि खाजगी शाळा बंद करण्यात आल्या आहेत.

Delhi flood | agrowon

पाणी कपात

दिल्लीला पाणीपुरवठा करणारे तीन वॉटर प्लांट बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक भागात पिण्याच्या पाणी कपात करावे लागले.

Delhi flood | agrowon
himachal pradesh flood | agrowon
आणखी पहा..