

Mango Festival : फळांच्या राजा म्हणून ज्याची ख्याती असलेल्या आंब्याचा हंगाम सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. महाराष्ट्रात कोकणात पिकणाऱ्या हापूस आंब्याला देश-विदेशातून विशेष मागणी असते.
आपल्या विशेष चव, रंग आणि सुंगधासाठी प्रसिध्द असणाऱ्या हापूससाठी आंबाप्रेमी कितीही पैसे मोजायला तयार असतात. मात्र, हापूसपेक्षाही महाग असणारा 'मियाझाकी आंबा' सध्या सिलीगुडी येथील मँगो फेस्टीव्हलमध्ये आंबाप्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे.
पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे सध्या आंबा महोत्सव सुरू आहे. यंजाच्या आंहा महोत्सवाचे हे सातवे वर्ष असून हे तीन दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे. यंदाच्या महोत्सवात जगातील सर्वात महाग मियाझाकी आंबा दाखल झाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या आंब्याची किंमत सुमारे दोन लाख ७५ हजार रुपये सांगितली जाते.
असोसिएशन फॉर फूड कंझर्वेशन अॅण्ड टुरिझम (एसीटी) यांच्या सहकार्याने मोडेला केअरटेकर सेंटर अॅण्ड स्कूल (एमसीसीएस) यांच्यावतीने या आंबा महोत्सावाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिलीगुडीच्या एका मॉलमध्ये ९ जूनपासून हा महोत्सव सुरू झाला आहे. या आंबा महोत्सवामध्ये मियाझाकी आंब्यासह २६२ हून अधिक आंब्याच्या जाती प्रदर्शित करण्यात आल्या आहे.
दरम्यान, नाबार्डच्या माध्यमातून 'अपनी वाडी' या परियोजनेंतर्गत सहावा आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहेत. ८ ते १२ जूनदरम्यान हा आंबा महोत्सव पार पडणार आहे.
नाबार्डच्या माहितीनुसार, वाडी परियोजनेंतर्गत आंब्याच्या अनेक जातींचे प्रदर्शन या आंबा महोत्सवामध्ये करण्यात येणार आहे. यामध्ये सुंदरजा, केशर, लंगडा आणि दशहरी सह इतर आंब्याच्या व्हरायटी विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.