Mango Variety : सोलापूर जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने चक्क एका आंब्याचा जातीला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांचे नाव दिले आहे. दत्तात्रय गाडगे असे या शेतकऱ्याचे नाव असून माढा तालुक्यातील अरण मधील रहिवाशी आहेत.
गाडगे यांनी आपल्या बागेतील आंब्याच्या कलमावर विविध प्रयोग करून अडिच किलोचा आंबा पिकवला आहे. गाडगे यांच्या शेतात या कलमाची जवळपास २० ते २५ झाडे असून त्यांनी या आंब्याला 'शरद मँगो' असे नाव दिले आहे.
म्हणून पवार यांचे आंब्याला नाव
सध्या सुरू असलेल्या आंबा महोत्सावत गाडगे यांच्या अडिच किलोच्या आंबा सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. गाडगे यांच्या या आंब्याला ग्राहकांकडूनही चांगली मागणी मिळत आहे.
दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी राज्यातील शेतकऱ्यांसाठी फळबाग योजना राबविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता.
याच योजनेतून आठ एकरमध्ये सात हजार आंब्याची झाडे लावल्याचे गाडगे सांगतात. यापैकीच एक असणाऱ्या अडिच किलोच्या आंब्याला गाडगे यांनी शरद मँगो असे नाव दिले आहे.
होमिओपॅथी औषधाचा वापर
अडिच किलो वजनाच्या आंब्याच्या उत्पादनासाठी आंब्याच्या एकाच झाडावर विविध प्रयोग करण्यात आले. यासाठी होमोपॅथीच्या विविध औषधांचा वापर करण्यात आला. देशात पहिल्यांदाच अडिच किलो वजनाच्या आंब्याचे उत्पादन झाल्याने बारामती कृषी महाविद्यालयात असलेल्या शास्त्रज्ञांना हा प्रयोग दाखविण्यात आल्याचे गाडगे सांगतात.
होमिओपॅथी औषधाचा वापर
अडिच किलो वजनाच्या आंब्याच्या उत्पादनासाठी आंब्याच्या एकाच झाडावर विविध प्रयोग करण्यात आले. यासाठी होमोपॅथीच्या विविध औषधांचा वापर करण्यात आला. देशात पहिल्यांदाच अडिच किलो वजनाच्या आंब्याचे उत्पादन झाल्याने बारामती कृषी महाविद्यालयात असलेल्या शास्त्रज्ञांना हा प्रयोग दाखविण्यात आल्याचे गाडगे सांगतात.
राजेंद्र पवार यांचा पुढाकार
बारामती कृषी विज्ञान केंद्र (केव्हीके) आणि बारामती अग्रिकल्चर डेव्हलोपमेंट ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी याबाबत अधिक अभ्यास करण्यासाठी पुढाकार घेतला. मागील चार ते पाच वर्षांपासून बारामती केव्हीके येथील वैज्ञानिकांच्या निरीक्षणाखाली शेतीमध्ये पिकावर होमिओपॅथी खते आणि औषधांचा वापराचा अभ्यास करण्यात आला.
दरम्यान, राजेंद्र पवार आणि डॉ. वीरेंद्र कुमार पाटील यांच्या अथक परिश्रमाने पिकावर होमिओपॅथी औषधांचा प्रयोग यशस्वी झाला आणि अडीच किलो वजनी आंब्याचे भरघोस उत्पादन निघाले.
बारामती कृषी महाविद्यालयातील शास्त्रज्ञांनी आंबा महोत्सवाला भेट दिली. यावेळी अडीच किलोच्या आंब्याला शरद पवार यांचे नाव देत शरद मँगो, असे नामकरण करण्यात आले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.