Miyazaki Mango : एका किलोची किंमत ३ लाख रुपये ; भारतात कुठे पिकतोय जगातला सर्वात महाग मियाझाकी आंबा

Mango Variety : महाराष्ट्रातल्या कोकणात पिकणारा हापूस आंब्याला देश-विदेशातून मोठी मागणी असते. आपल्या विशिष्ट चव, रंग आणि सुगंधामुळे हापूस आंब्याला फळांचा राजा असेही म्हणातात.
Miyazaki Mango
Miyazaki MangoAgrowon
Published on
Updated on

Worlds Expensive Miyazaki Mango : या वर्षीच्या महाराष्ट्रातील आंब्याचा हंगाम जवळपास संपल्यात जमा आहे. यंदाचा आंब्याचा हंगाम सर्वसाधारणच राहिला. वाढते तापमान, कीडरोगांचा प्रादुर्भाव आणि अवकाळी पावसाचा आंबा उत्पादनाला मोठ्या प्रमाणात फटका बसला. परिणामी यंदा बाजारातही आंब्याची आवक कमीच राहिल्याचे दिसले. त्यामुळे आंबाप्रेमी खवय्यांचा काहीसा हिरमोड झाला.

महाराष्ट्रातल्या कोकणात पिकणारा हापूस आंब्याला देश-विदेशातून मोठी मागणी असते. आपल्या विशिष्ट चव, रंग आणि सुगंधामुळे हापूस आंब्याला फळांचा राजा असेही म्हणातात. पण हापूसपेक्षाही महाग असणारा आंबा आता भारतात पिकवला जात आहे. प्रामुख्याने जपानमध्ये हा आंबा पिकवला जातो.

जगातील सर्वात महाग आंबा

मियझाकी असे या आंब्याच्या जातीचे नाव असून जगातील सर्वात महागडा आंबा अशी याची ख्याती आहे. जपानमध्ये पिकवला जाणारा हाच आंबा आता भारतातील पश्चिम बंगाल या राज्यात पिकवला जात आहे. याशिवाय झारखंडमधील जामतारामध्येही काही प्रमाणात पिकवला जात आहे.

Miyazaki Mango
Sharad Pawar Mango Variety : अन् शेतकऱ्यानं आंब्याला दिलं शरद पवारांच नाव

किलोची किंमत ३ लाख रूपये

बंगालच्या वीरभूम जिल्ह्यामधील एका मशिदीमध्ये मियाझाकी या आंब्याचे झाड लावण्यात आले आहे. जगातील सर्वात महाग असणाऱ्या आंब्याची किंमत प्रतिकिलो तीन लाख रुपये असल्याचे सांगितले जाते.

एका किलोमध्ये जर चार-पाच आंबे येत असतील तर, तुम्ही अंदाज लावू शकता की, एका नगाची किंमत किती असेल. पण म्हणतात ना हौसेला मोल नसते, तसेच या आंब्याचे शौकीनही याच्यासाठी पाहिजेल ती किंमत द्यायला तयार असतात.

Miyazaki Mango
Mango Verity Name : आंब्याच्या जातीला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरचं नाव

मियाझाकी आंब्याची वौशिष्ट्ये

प्रामुख्याने जपानमध्ये घेतला जाणारा मियाझाकी आंबा हा एप्रिल ते ऑगस्ट या कालावधीत पिकवला जातो. या आंब्याच रंग नेहमीच्या पिवळ्या, केशरी रंगापेक्षा वेगळा असतो. मियाझाकी आंब्याचा रंग वांगी किंवा जांभळ्या प्रकाराचा असतो.

पिकल्यानंतर आंबा लाल रंगामध्ये बदलतो. एका मियाझाकी जातीच्या आंब्याचे वजन जवळपास ३५० ग्रॅमपासून ९०० ग्रॅमपर्यंत असते. या आंब्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मांमुळे याची किंमत महाग असल्याचे सांगितले जाते.

मियाझाकी आंबा इतका महाग का?

सर्वसाधारण आंब्याच्या तुलनेत मियाझाकी आंब्यामध्ये १५ टक्क्यांहून अधिक साखरेचे प्रमाण असते. याशिवाय यामध्ये अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांचाही समावेश असतो. तसेच यामध्ये बीटो कॅरोटीन आणि फोलिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते. डोळ्यांची दृष्टी कमी असणाऱ्यांसाठी हा आंबा फायदेशीर असल्याचे मानले जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com