Rabbit Farming : राजस्थानच्या संशोधन केंद्रात सशांच्या सहा प्रजातींवर काम

Rabbit Rearing : खवय्यांच्या संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या काळात मांसल उद्योगात शेळी, कुक्‍कुटपालनाच्या धर्तीवर ससेपालनाचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे.
Rabbit Farming
Rabbit FarmingAgrowon
Published on
Updated on

Amravati News : ‘‘खवय्यांच्या संख्येत सातत्याने होणाऱ्या वाढीच्या पार्श्‍वभूमीवर येत्या काळात मांसल उद्योगात शेळी, कुक्‍कुटपालनाच्या धर्तीवर ससेपालनाचा पर्याय उपलब्ध करून दिला जाणार आहे. अविका (राजस्थान) येथे केंद्रीय मेंढी व लोकर संशोधन केंद्राने त्यासाठी मांसल म्हणून उपयोगी ठरणाऱ्या देशातील सहा सशांच्या प्रजातींवर काम सुरू केले आहे,’’ अशी माहिती केंद्राचे संचालक डॉ. अरुणकुमार तोमर यांनी दिली.

अमरावती दौऱ्यावर असलेल्या डॉ. तोमर यांनी बुधवारी (ता. ७) ‘ॲग्रोवन’सोबत संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘अविका येथे १९६२ पासून मेंढी, शेळी व इतर मांसल तसेच लोकरकामी उपयोगी पडणाऱ्या जनावरांवर संशोधन कार्य होते. यामध्ये १९६२ पासून मेंढीवर तर १९७६ पासून सिरोही शेळीवर संशोधन सुरू आहे. मांस, दूध आणि लोकर याचे उत्पादन वाढ याविषयी संस्था काम करते. ७० ते ८० टक्‍के मांस, २० टक्‍के लोकर व इतर घटक ५ ते ७ टक्‍के राहतात.’’

Rabbit Farming
Animal Care : विदर्भ-मराठवाड्यातील जनावरांना लागणार कॉलर

‘‘दक्षिण भारतात मेंढीपालन अधिक होते. थंडी जास्त राहते. त्यामुळे लोकरचा दर्जा चांगला असतो. तापमान अधिक असलेल्या भागातील लोकरला कोर्स उल म्हणतात. यापासून कारपेट तयार होते. राजस्थानमध्ये चोकला, मगरा, गुजरातमध्ये पाटणवाडी, महाराष्ट्रात दख्खन भागात जाड लोकर उत्पादित करणारी मेंढी आहे.

Rabbit Farming
Animal Care : बाह्यपरजिवींमुळे जनावरांवर काय परिणाम होतात?

याचे मांस चवीला चांगले आहे. खवय्यांची मागणी वाढती असल्याने त्यांना पर्याय देणे गरजेचे आहे. त्या पार्श्‍वभूमीवर कोंबड्या, शेळ्या आणि मेंढ्यांसोबतच आता सशांच्या मांसाचा पर्याय संस्था उपलब्ध करून देईल. त्यासाठी देशातील सहा सशांच्या प्रजातीवर काम होत आहे,’’ असे डॉ. तोमर म्हणाले.

‘सशेपालन भक्‍कम आर्थिकस्रोत ठरेल’

‘‘सशाचे पांढरे मटण कोलोस्ट्रॉल मुक्त राहते, असा अभ्यास आहे. म्हणून सशाच्या मांसाला येत्या काळात मागणी वाढेल. मांस वगळता उर्वरित भागापासून टोपी, लेडीजपर्स, जॅकेटच्या आतील भाग तयार करण्यासाठीचे घटक मिळतात.

स्वयंपाकाच्या उष्ट्या अन्नावर यांचे पालन होते. एका मादीपासून वर्षभरात ३० ते ३५ पिल्ले मिळतात. परिणामी, सशेपालन हा शेतकऱ्यांसाठी भक्‍कम आर्थिकस्रोत ठरेल. व्हाइट जॉइंट, सोविएंट चिंचाली, ब्लॅक ब्राऊन यांसारखी अनेक प्रजातींवर काम सुरू आहे,’’ असे डॉ. तोमर यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com