Fertilizer Shortage : खते शिल्लक, मग टंचाई का?

Urea Fertilizer Shortage : युरियाची टंचाई वाढली आहे. प्रशासनाने ई-पॉसमध्ये २० हजार टन युरियाचा साठा असल्याची बतावणी केली आहे, पण कृषी केंद्रांत युरिया मिळत नाही.
Fertilizer
Fertilizer Agrowon

Jalgaon News : जिल्ह्यात युरियाची टंचाई वाढली आहे. प्रशासनाने ई-पॉसमध्ये २० हजार टन युरियाचा साठा असल्याची बतावणी केली आहे, पण कृषी केंद्रांत युरिया मिळत नाही. तीन युरियाच्या गोण्या हव्या असल्यास ६०० रुपयांचे विद्राव्य किंवा अन्नघटकयुक्त खत शेतकऱ्यांच्या माथी मारून जोमात लिंकिंग केले जात आहे.

कृषी विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात सध्या खतांचा १ लाख‌ २२ हजार ८७२ मेट्रिक टन साठा उपलब्ध आहे. मुख्य खत युरियाचा २२ हजार १३२ मेट्रिक टन साठा आहे. जिल्हा नियोजन बैठकीत युरिया खतांच्या टंचाईचा मुद्दा उपस्थित झाला होता.

Fertilizer
Fertilizer Shortage : खताची कमतरता का निर्माण झाली?

यावर जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी लवकरच खत उपलब्धतेचा आढावा घेऊन युरिया खताचे पुनर्वितरण करण्याच्या सूचना कृषी विभाग व जिल्हा परिषद विभागास दिल्या होत्या. त्यानुसार जिल्ह्यातील खतांचे पुनर्वितरण करण्यात आले आहे. एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत आवश्यकतेप्रमाणे दरमहा पुरवठा करण्यात येत असतो. जिल्ह्यात आज रोजी २ लाख ४३ हजार १०३ मे. टन खतांचा पुरवठा करण्यात आलेला असून, मुख्य खत युरियाचा ७६ हजार ६९९ मे. टन पुरवठा झालेला आहे.

२२ ऑगस्टला आरसीएफ कंपनीमार्फत ३००० मे. टन व एनएफएल कंपनीचा २६०० मे. टन युरिया पुरवठा करण्यात आलेला असून, पुढील आठवड्यात इफ्को कंपनीचा २६०० मे. टन युरिया खताचा व कृभको कंपनीचा २६०० मे. टन युरिया खतांच्या पुरवठा होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी खत भरून न ठेवता, जसे लागेल तशी खताची खरेदी करावी.

Fertilizer
Fertilizer Shortage : अमरावती जिल्हाभरात खतांचा तुटवडा

युरिया, एसएसपी व पोटॅश या मूलभूत खतांचा वापर करुनदेखील घरच्या घरी मिश्र खते बनवता येतील. बियाणे व खत खरेदी करताना जिल्ह्यातील अधिकृत वितरकांकडूनच खरेदी करावे. पुढील आठवड्यात इफ्को व कृभको कंपनीचा ५२०० मेट्रिक टन युरिया खताचा पुरवठा होणार आहे. खतांचा जिल्ह्यात मुबलक प्रमाणात साठा उपलब्ध आहे, असे जिल्हा परिषदेतील कृषी विभागाने म्हटले आहे.

या भागात टंचाई..

जिल्ह्यात जळगाव, चोपडा, यावल, रावेर, मुक्ताईनगर, एरंडोल, जामनेर आदी सर्वच भागांत युरियाची टंचाई आहे.

लिंकिंगवर कारवाई का नाही?

कृषी विभाग खते शिल्लक असल्याचे सांगतो. पत्रके जारी करतो, पण खतांवरील लिंकिंग, कृत्रीम टंचाई यावर कारवाई केली जात नाही. कुणाचा बचाव केला जातो, काय कारण आहे, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com