Team Agrowon
खरिपात खतांची मागणी सुरू होताच कृत्रिम टंचाई व लिकींगने गती घेतली आहे. यातच बनावट खतांचा बाजारही वेगात सुरू आहे.
एका शेतकऱ्याला तीन ते चारच गोण्या युरिया देण्यात येत आहेत. काही विक्रेते आपल्या मोठ्या ग्राहकांनाच अधिकची किंवा हवी तेवढी खते देत आहेत.
इतर ग्राहकांना पाच युरियाच्या गोण्यांसोबत इतर अन्नद्रव्ये घेण्याची सक्ती केली जात असून, यामुळे २६६ रुपयांची युरियाची गोणी ३५० रुपयांना पडत आहे किंवा उत्पादन खर्च वाढत आहे.
नॅनो युरिया व इतर अन्नद्रव्यांची सर्रास लिंकींग केली जात आहे. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे. यातच हवी ती खते मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत.
खतांची कृत्रीम टंचाई आहे, लिंकींग वेगात सुरू आहे, याबाबत कृषी विभाग स्पष्टपणे बोलत नाही. कंपन्याच मुजोरी करतात, असे विक्रेते व कृषी विभागाचे म्हणणे आहे.