
Amravati News : पावसाने उसंत दिल्याने शेतकऱ्यांकडून खतांची मागणी वाढल्याने टंचाई असल्याची ओरड होत आहे. त्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाकडून खतांचा साठा उपलब्ध करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
जिल्हा कृषी कार्यालयाकडून संरक्षित साठ्यातील युरिया व डीएपीचा १०१७ टन साठा मुक्त करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने खरीप हंगामासाठी १ लाख ६० हजार टन खतांची मागणी नोंदविली होती. त्यानुसार १ लाख १४ हजार ३१० टन आवंटन मंजूर करण्यात आले.
२० एप्रिलपर्यंत ११ हजार ९३७ टन साठा उपलब्ध झाला. गत हंगामातील शिल्लक साठा मिळून जिल्ह्यात ४५ हजार ४७ टन साठा उपलब्ध झाला होता. खरीप हंगाम २०२३ साठी १०१० टन युरिया व १०८० टन डीएपीचा साठा संरक्षित केला आहे.
यामधून धारणी व चिखलदरा तालुक्यासाठी साठा मुक्त करण्यात आला होता. त्याचप्रमाणे सर्व तालुक्यांसाठी ३९३ टन साठा मुक्त केला होता. त्यानंतर शिल्लक ६८७ टन युरियाच्या साठ्यातून ३४३ टन व डीएपीचा संपूर्ण ६७४ टन साठा मुक्त केला आहे.
तालुकानिहाय उपलब्ध साठा (टन)
तालुका युरिया डीएपी
अमरावती २३ ४५
भातकुली १३ २५
दर्यापूर ५४ १०९
अंजनगावसुर्जी ४० ११७
अचलपूर ४१ ८१
चिखलदरा १४ २५
धारणी २४ १५
चांदूरबाजार ३० ८९
तिवसा १० २५
नांदगाव खंडेश्वर ११ ००
मोर्शी ४२ ५८
वरुड ४१ ८५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.