NCP Crisis राष्ट्रवादी कुणाची ? निवडणूक आयोगासमोर 6 ऑक्टोबरला सुनावणी

Sharad Pawar vs Ajit Pawar : राष्ट्रवादीतील बंडानंतर पक्ष कोणाचा ? यावरून शरद पवार आणि अजित पवार गटांमध्ये वाद सुरू आहे. यावर 6 ऑक्टोबरला निवडणूक आयोगासमोर होणार सुनावणी होणार आहे.
NCP Party
NCP PartyAgrowon

NCP Crisis News : राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये अजित पवार यांनी बंड केले. त्यांना पक्षातील बहुतांशी आमदारांनी पाठिंबा दिला. या फुटीनंतर पक्षात दोन गट पडले असून दोन्ही गटाकडून पक्षावर दावा केला जात आहे. या प्रकरणावर निवडणूक आयोगासमोर ६ ऑक्टोबर रोजी सुनावणीसाठी बोलावले आहे.

NCP Party
NCP Crisis : शरद पवार गटाकडून ४० आमदारांच्या विरोधात अपात्रतेची याचिका

राज्यातील सत्ता संघर्षात शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात देखील फूट पडली आहे. अजित पवार यांच्यासह ९ जणांनी शिवसेना-भाजप युती सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली. या पक्ष फुटीनंतर अजित पवार यांच्या गटाने पक्ष आणि चिन्हावर दावा करत राष्ट्रीय अध्यक्षपदावरून शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांना हटवून अनुक्रमे अजित पवार आणि सुनील तटकरे यांची निवड करण्यात आली.

पक्ष कुणाचा हा वाद आता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दारात पोहोचला आहे. आयोगाने दोन्ही गटांना नोटीस पाठवून आपली बाजू मांडण्यास सांगितले होते. याप्रकरणाची ६ ऑक्टोबर रोजी सुनावणी होणार आहे. त्यामध्ये दोन्ही गटा आपआपली बाजू मांडणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com