Wheat Harvesting : गव्हाची पिके काढणीच्या अवस्थेत

रब्बी हंगामात गव्हाच्या पेरणीस उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गहू पिकाला मोठी पसंती दिली गेली.
Wheat Harvesting
Wheat HarvestingAgrowon
Published on
Updated on

Wheat Harvesting News पुणे ः रब्बी हंगामात गव्हाच्या पेरणीस (Wheat Sowing) उशिराने पोषक हवामान तयार झाल्याने पुणे विभागात गहू पिकाला (Wheat Crop) मोठी पसंती दिली गेली.

सध्या गव्हाची पिके ओंबीच्या व काढणीच्या (Wheat Harvesting) अवस्थेत असून, येत्या दहा ते पंधरा दिवसांत गव्हाच्या काढणीला सुरुवात होईल, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

यंदा विभागात सरासरी एक लाख ६८ हजार ७९६ हेक्टरपैकी दोन लाख ४४ हजार १२३ म्हणजेच १४५ टक्के पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत पेरणीच्या क्षेत्रात तब्बल ७५ हजार ३२७ हेक्टरने वाढ झाली आहे.

गव्हाच्या पेरणीस नोव्हेंबर ते डिसेंबर हा कालावधी चांगला असतो. मात्र उशिराने झालेल्या पावसामुळे आणि वेळेत वाफसा न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी उशिराने गव्हाच्या पेरणी केल्या.

उशिराने गहू पिकासाठी पोषक स्थिती निर्माण झाल्याने गहू पेरणीला मोठ पसंती दिली गेली. त्यामुळे यंदा गव्हाची पेरणी १४५ टक्के एवढी झाली आहे.

Wheat Harvesting
Wheat Rate : तिसऱ्या लिलावात ५ लाख टन गव्हाची विक्री

सध्या अनेक ठिकाणी गहू पिके निसवण्याच्या व पक्वतेच्या अवस्थेत आहे. पुणे जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग, नगर जिल्ह्याच्या उत्तरेकडील तालुके, सोलापुरातील अक्कलकोट, मंगळवेढा, दक्षिण सोलापूर, मोहोळ हे तालुके गव्हाच्या पिकांसाठी ओळखली जात असून, विभागात अक्कलकोट तालुक्यात सर्वाधिक पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यातही गव्हाच्या चांगल्या पेरण्या झाल्या असून, आतापर्यंत सर्वाधिक गव्हाची पेरणी पाथर्डी, शेवगाव तालुक्यांत झाली आहे. दोन्ही तालुक्यांत सुमारे १२ हजार ८९ हेक्टरच्या दरम्यान गव्हाची पेरणी झाली आहे.

Wheat Harvesting
Wheat Market : गव्हाचे दर पाडून हमीभावाखाली आणण्यासाठी सरकार आक्रमक

त्याखालोखाल नेवासा, कोपरगाव, नगर, राहाता, पारनेर, राहुरी, कोपरगाव या तालुक्यांतही चांगली पेरणी झाली आहे. जामखेड, संगमनेर, अकोले, कर्जत या तालुक्यांत काहीशा कमी पेरण्या झाल्या आहेत.

सोलापूर जिल्ह्यातही अक्कलकोट तालुक्यात सुमारे १७ हजार १४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. त्यानंतर दक्षिण सोलापूर, मोहोळ, दक्षिण सोलापूर, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस, मंगळवेढा या तालुक्यांतही चांगली पेरणी झाली आहे.

बारामती, दौंड तालुक्यांत सर्वाधिक पेरणी

पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड तालुक्यांत सर्वाधिक गव्हाची पेरणी झाली आहे. सुमारे सात हजार ५२४ हेक्टरच्या दरम्यान पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ शिरूर, इंदापूर, दौंड, पुरंदर, जुन्नर या तालुक्यांत चांगल्या पेरण्या झाल्या आहे. तर हवेली, मुळशी, मावळ, वेल्हे, भोर, आंबेगाव तालुक्यांत कमी पेरण्या झाल्या आहेत.

पुणे विभागात झालेली गव्हाची पेरणी, हेक्टरमध्ये ः

जिल्हा --- सरासरी क्षेत्र --- झालेली पेरणी -- टक्केवारी

नगर --- ८६,४०५ -- १,३७,०७५ ---१५९

पुणे --- ३९,८०३ --- ४३,६३७-- ११०

सोलापूर --- ४२५८८ --- ६३,४११ -- १४९

एकूण -- १,६८,७९६ -- २,४४,१२३ -- १४५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com