Heat Wave Maharashtra : महाराष्ट्र तापला, कोकणात उष्णतेची लाट

राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत असतानाच, उन्हाच्या झळा देखील वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेल्याने महाराष्ट्र तापला आहे.
Heat Wave
Heat Wave Agrowon

Weather Update Pune : राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी (Rainfall) लावत असतानाच, उन्हाच्या झळा देखील वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी तापमान चाळीशीपार गेल्याने महाराष्ट्र तापला आहे.

कोकणात उष्णतेची लाट (Heat Wave) असून, विदर्भातही उन्हाचा चटका तापदायक ठरत आहे. आज (ता. २१) विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

राज्यात कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. किनारपट्टीय भागात कमाल तापमान ३७ अंशांच्या पुढे गेल्यास व तापमानात सरासरीच्या तुलनेत ४.५ अंशांची वाढ झाल्यास उष्णतेची लाट समजली जाते. सांताक्रूझ आणि डहाणू येथे उष्णेतेची लाट आली आहे. गुरूवारी (ता. २०) दुपारनंतर पुणे, नाशिक जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि हलकी गारपीट झाली.

Heat Wave
EL Nino Effect : आधीच उल्हास त्यात एल-निनोचा फास...

गुरूवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये ब्रह्मपूरी येथे राज्यातील उच्चांकी ४३.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. गोंदिया येथे तापमान ४३ अंशाच्या पार असून, चंद्रपूर, वर्धा, अकोला, सोलापूर, अमरावती, नागपूर, यवतमाळ येथे तापमानाचा पारा ४२ अंशांच्या वर सरकला आहे. उर्वरीत राज्यात कमाल तापमान ३५ ते ४२ अंशांच्या दरम्यान आहे.

तेलंगणापासून, रायलसीमा ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत समुद्र सपाटीपासून ९०० मीटर उंचीवर हवेचा कमी दाबाचा पट्टा व खंडीत वाऱ्यांची स्थिती कायम आहे. आज (ता. २१) विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी पावसाचा इशारा आहे.

तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. राज्यात उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

Heat Wave
Weather News : मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता

गुरूवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान, कंसात किमान तापमान (अंश सेल्सिअस मध्ये) :

पुणे ४०.० (२१.१), जळगाव ४१.९ (२३.८), धुळे ४०.६ (२२.०), कोल्हापूर ३९.५ (२३.७), महाबळेश्वर ३३.२ (१४.८), नाशिक ३८.८(२१.५),

निफाड ३९.८(१८.०), सांगली ३९.९ (२१.६), सातारा ३९.९ (२१.६), सोलापूर ४२.२ (२५.४), सांताक्रूझ ३८.८ (२६.६), डहाणू ३७.६ (२५.०), रत्नागिरी ३३.७ (२५.७),

छत्रपती संभाजीनगर ४०.६ (२२.०), नांदेड ४०.६ (२४.६), परभणी - (१९.०), अकोला ४२.४ (२४.६), अमरावती ४२.२(२४.५), बुलढाणा ३९.६ (२५.२), ब्रह्मपूरी ४३.८ (२८.१),

चंद्रपूर ४२.८ (२६.६), गडचिरोली ४१.६(२३.४), गोंदिया ४३.५ (२७.०), नागपूर ४२.० (२६.२), वर्धा ४२.५(२६.२), वाशीम ४०.८ (-), यवतमाळ ४२.० (२६.०).

वादळी पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

विदर्भ : यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com