Cotton Soybean : अरबी समुद्रात गुरुवारी शेतकऱ्यांसह जलसमाधी घेऊ

सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या प्रश्नांबाबत सरकारला जागे करण्यासाठी आता आरपारची लढाई लढणार.
Cotton, soybean growers
Cotton, soybean growersAgrowon
Published on
Updated on

बुलडाणा : ‘‘सोयाबीन-कापूस उत्पादकांच्या (Cotton, soybean Farmer) प्रश्नांबाबत सरकारला जागे करण्यासाठी आता आरपारची लढाई लढणार. यासाठी हजारो शेतकऱ्यांसह अरबी समुद्रात (Arabian Sea) जलसमाधी घेऊ,’’ असा इशारा रविकांत तुपकर (Ravikant Tupakr) यांनी शासनाला दिला आहे.

कापूस, सोयाबीन उत्पादकांच्या प्रश्नांवर तुपकर यांनी नुकताच बुलडाण्यात एल्गार मोर्चा काढला. सोयाबीन - कापूस उत्पादकांच्या रास्त मागण्यांसाठी मागील वर्षातही राज्यभर आंदोलन पेटवले होते. यावर्षी देखील सोयाबीन-कापसाच्या प्रश्नासाठी पुन्हा एल्गार पुकारला आहे. मागण्यांबाबत मंगळवार (ता.२२) पर्यंत निर्णय न झाल्यास बुधवारी (ता.२३) हजारो शेतकरी, कार्यकर्ते मुंबईकडे कूच करतील आणि गुरुवारी (ता.२४) सकाळी मंत्रालयाशेजारी मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटीवरुन अरबी समुद्रात जलसमाधी घेतील, असे म्हटले आहे.

Cotton, soybean growers
Crop Damage : नुकसानीबाबत साडेचार लाख दावे

...या आहेत काही प्रमुख मागण्या

शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या

सोयाबीनची वायदे बाजारावरील बंदी उठवा

सोयाबीनला किमान ८ हजार ७०० रुपये आणि कापसाला १२ हजार ७०० रुपये दर द्या

सोयापेंड (डीओसी) निर्यातीला प्रोत्साहन द्या

यंदा १५ लाख मेट्रिक टन सोयापेंड निर्यात करा

खाद्य तेलांवरील आयात शुल्क ३० टक्के करा

कापसाचे आयात शुल्क पूर्वीप्रमाणे ११ टक्के ठेवा

कापूस व सूत निर्यातीला प्रोत्साहन द्या

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com