Tomato Market : घसरलेल्या टॉमॅटो दरामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

Tomato Market Update : मागील महिन्यात आवक कमी असल्याने टोमॅटो दरात तेजी होती. परिणामी, सरकारने टोमॅटो दर नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले.
Tomato Market : घसरलेल्या टॉमॅटो दरामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट

Nashik News : मागील महिन्यात आवक कमी असल्याने टोमॅटो दरात तेजी होती. परिणामी, सरकारने टोमॅटो दर नियंत्रित करण्याचे प्रयत्न केले. मात्र आता अवघ्या महिन्यातच टोमॅटोसह भाजीपाल्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून, पिंपळगाव येथे लिलाव बंद पाडले, तर लासलगावात टोमॅटो रस्त्यावर फेकून देण्यात आले.

मंगळवारी (ता. ६) सायंकाळी टोमॅटोच्या दराने नीचांकी ८० रुपये प्रतिक्रेट दर गाठल्याने संतापलेल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकून निषेध करीत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. तर भाजीपाल्याच्या प्रतिक्रेटला ३० ते ५० रुपये मातीमोल भाव व्यापाऱ्यांनी पुकारल्याने संतप्त शेतकऱ्यांनी पिंपळगाव बसवंत येथे भाजीपाल्याचे लिलाव बंद पाडले. तर बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले. तर लासलगाव येथे शेतकऱ्यांनी रस्त्यावर टोमॅटो फेकत संताप व्यक्त केला.

Tomato Market : घसरलेल्या टॉमॅटो दरामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
Onion, Tomato Market Rate : सोयाबीन, कांदा, टोमॅटोच्या किमतींत घट

एकीकडे पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे विहिरीतील पाणीसाठा संपुष्टात आला.हातात भांडवल नाही अशा प्रतिकूल परिस्थितीत शेतकऱ्यांनी भाजीपाला लागवडी केल्या. मात्र शेतकऱ्यांच्या प्रयत्नांवर पाणी फिरले आहे. त्यामुळे उत्पादन खर्चही फिटणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटल्या.

टोमॅटोचे दर घसरले असताना बुधवारी सकाळी भाजीपाला लिलाव सुरू झाले. वांगी, कोबी, ढोबळी मिरची, घेवडा, दोडकी, मिरची असा भाजीपाला घेऊन शेतकरी आले होते. भाजीपाल्यांच्या प्रतिक्रेटला २० ते ५० रुपये म्हणजे १ ते २.५ रुपये प्रतिकिलो दर पुकारला. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी वाढली आहे.

Tomato Market : घसरलेल्या टॉमॅटो दरामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट
Tomato Rate : टोमॅटोचे भाव गडगडले, रस्त्यावर फेकण्याची आली वेळ; सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येणार का?

कमी बोली लागल्याने शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी थेट लिलाव बंद पाडत बाजार समितीच्या प्रशासकीय कार्यालयावर धडक दिली. मंगळवारपर्यंत सरासरी १५० रुपये प्रतिक्रेटचा भाव भाजीपाल्याला पुकारला जात होता. तो अचानक १०० रुपयांनी खाली आल्याने शेतकऱ्यांनी प्रश्‍न उपस्थित केले. शेतकऱ्यांनी थेट प्रशासकीय कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर भाजीपाला घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले.

सरकारचे दुर्लक्ष का?

शेतकऱ्यांबरोबर बाजार समितीचे संचालक यतीन कदम यांनी ठिय्या दिला. कदम यांनी व्यापाऱ्यांना बाजारभाव कोसळण्याची कारणे विचारली. त्यावर भाजीपाल्याला अपेक्षित मागणी नसल्याचे कारण व्यापाऱ्यांनी सांगितले. दरवाढ झाल्यावर शासन हस्तक्षेप करते. आता भाव कोसळल्यावर का दुर्लक्ष करीत आहात, असा सवाल शेतकऱ्यांनी या वेळी विचारला

लासलगावात टोमॅटो फेकले रस्त्यावर

लासलगाव बाजार समितीच्या आवारात टोमॅटोला २ ते ५ रुपये किलो दर मिळाल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकून देत रोष व्यक्त केला. २० किलोच्या क्रेटला ५० ते १०० रुपये भाव मिळत आहे.

लाखो रुपये खर्च करून टोमॅटोचे पीक घेतले. मात्र मोठ्या प्रमाणात दरात घसरण झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्याचा उत्पादन खर्च तर दूरच, वाहतूक आणि मजुरी खर्च निघणे मुश्कील झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. भाव कमालीचे घसरल्याने संतप्त शेतकऱ्याने थेट बाजार समितीच्या आवारातच टोमॅटो फेकून संपात व्यक्त केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com