
Satara News : पावसाने दडी मारल्याने जिल्ह्यातील अनेक भागांत पाणीटंचाई वाढ होत आहे. त्यामुळे टॅंकरच्या संख्येत वाढ होत आहे. सध्या जिल्ह्यात ८० टॅंकरद्वारे ७८ गावे ३९० वाड्या-वस्त्यांवर पाणीपुरवठा सुरू आहे. टँकर भरण्यासाठी २० विहिरी व ३३ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले.
जिल्ह्यात पाऊस गायब झाल्याने पाणीटंचाई संकट भीषण होत आहे. पूर्व भागातील माण, खटाव, फलटण तालुक्यांत सर्वाधिक टंचाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. सध्या जिल्ह्यात ८० टॅंकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.
यामध्ये माण तालुक्यात सर्वाधिक ५६ टॅंकरद्वारे ४६ गावे आणि ३२९ वाड्या-वस्त्यांवर, खटाव तालुक्यात दहा टॅंकरद्वारे १४ गावे २४ वाड्या-वस्त्यांवर, फलटण तालुक्यात दहा टँकरद्वारे १० गावे ३७ वाड्या-वस्त्यांवर, कोरेगाव तालुक्यातील सहा गावांत तीन टॅंकरद्वारे, तर वाई तालुक्यातील दोन गावांत एका टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
टँकर भरण्यासाठी अधिग्रहण केलेल्या विहिरींची पाणी पातळी कमी होत असल्याने विहिरींच्या संख्येत वाढ करावी लागणार आहे. सध्या संरक्षित पाण्यासाठी जिल्ह्यातील २० विहिरी व ३३ बोअरवेलचे अधिग्रहण केले आहे.
यामध्ये माणमधील ३ विहिरी १६ बोअरवेल, खटावमधील चार विहिरी व १५ बोअरवेल, फलटणमधील ३, कोरेगावमधील ६ विहिरी व दोन बोअरवेल तर वाईमधील पाच विहिरींचा समावेश आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.