
Pune News : देशातील महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा चिंताजनक पातळीवर आहे. सध्याचा पाणीसाठा १० वर्षांमधील नीचांकी पातळीवर पोहोचला. तर महत्त्वाच्या २३ जलाशयांमधील पाणीसाठी ५० टक्क्यांपेक्षा कमी आहे. मोठ्या जलाशयांमधील पाणीसाठी कमी असल्याने पिकांच्या सिंचनाची समस्या निर्माण होऊ शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
देशातील महत्त्वाच्या १५० जलाशयांमधील पाणीसाठा ३१ ऑगस्ट रोजी ११३.४१७ बिलियन क्युबिक मीटर होता. हा पाणीसाठा या जलाशयांच्या एकूण क्षमतेच्या केवळ ६३ टक्के आहे. मागील हंगामात हाच पाणीसाठी सरासरीऐवढा होता.
तर जिवंत पाणीसाठ्याचा विचार करता गेल्यावर्षीच्या तुलनेत केवळ ७७ टक्के जिवंत पाणीसाठा आहे. तर गेल्या १० वर्षांतील सरासरीच्या ९१ टक्के जिवंत पाणीसाठा आहे, अशी माहिती केंद्रीय जल आयोगाने दिली.
देशातील महत्त्वाच्या जलाशयांमधील पाणीसाठा रब्बीसाठी महत्त्वाचा असतो. या जलाशयांमध्ये पाणीसाठा वाढला तर रब्बीसाठी पाणी उपलब्ध होते. रब्बीचे सिंचन उपलब्ध पाणीसाठ्यावर अवलंबून असते. पण सध्या या जलाशयांमध्ये पाणीसाठा कमी प्रमाणात उपलब्ध आहे. यामुळे चिंता वाढली.
मॉन्सूनच्या पावसाचे तीन महिने आता संपले आहेत. केवळ सप्टेंबर महिन्यात मॉन्सूनचा पाऊस पडू शकतो. पण हवामान विभागाच्या अंदाजानुसार, सप्टेंबरमध्येही देशाच्या अनेक भागांत पाऊस सरासरीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे.
बिहारमध्ये सर्वांत कमी पाणीसाठा
बिहारमधील जलाशयांत सरासरीपेक्षा ६६ टक्के कमी पाणीसाठा शिल्लक आहे. तर तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील जलाशयांमधील साठा ५७ टक्क्यांनी कमी आहे. तसेच तमिळनाडूतील जलाशयांत ५२ टक्के आणि केरळमध्ये ४९ टक्क्यांनी कमी पाणी शिल्लक आहे.
उत्तर प्रेदशातील पाणीसाठा सरासरीपेक्षा ४१ टक्क्यांनी, ओडिशातील पाणीसाठा २६ टक्क्यांनी, झारखंडमधील पाणीसाठा २५ टक्क्यांनी आणि कर्नाटकातील पाणीसाठा सरासरीपेत्रक्षा २२ टक्क्यांनी कमी आहे. हिमाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, नागालॅंड आणि उत्तरखंडमधील जलाशयांमधील पाणीसाठा काहीसा अधिक आहे.
उत्तर भारतात चांगला पाणीसाठा
उत्तर भारतातील पंजाब, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमधील जलाशयांमध्ये ८३ टक्के पाणीसाठा आहे. तर मध्य भारतातील उत्तर प्रदेस, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि उत्तराखंड या राज्यांमधील पाणीसाठा ७७ टक्के आहे.
गुजरात आणि महाराष्ट्रातील जलाशयांत एकूण ७१ टक्के साठा आहे. दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, केरळ आणि तमिळनाडू या राज्यांमधील जलाशयांत क्षमतेच्या ४९ टक्के पाणीसाठी आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.