Satara Water Crisis: सातारा जिल्ह्यात ५५ टॅंकरद्वारे पाणीपुरवठा

Satara Water Shortage : जुलै महिना सुरू झाला असला तरी जिल्ह्यात पाणीटंचाईची परिस्थिती कायम आहे. खंडाळा तालुक्याचा अपवाद वगळता दहा तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत.
Tanker Water Supply
Tanker Water SupplyAgrowon
Published on
Updated on

अॅग्रोवन वृत्तसेवा
Satara News
: सातारा ः जुलै महिना सुरू झाला असला तरी जिल्ह्यात पाणीटंचाईची (Water Defect) परिस्थिती कायम आहे. खंडाळा तालुक्याचा अपवाद वगळता दहा तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी टँकर सुरू आहेत.

सध्या जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील ६२ गावे २७० वाड्यावस्त्यांवरील ८२ हजार २६ लोकांना ५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. पाऊस असाच गायब राहिल्यास पाणीटंचाई भीषण होणार आहे.

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात पावसाची रिमझिम सुरू असलीतरी जोर नसल्यामुळे पेरणीची कामे संथगतीने सुरू आहेत. दोन दिवसांपासून तुरळक पाऊस सुरू आहे.

यामुळे पाण्याची टंचाई कायम आहे. जिल्ह्यातील खंडाळा तालुक्याच्या अपवाद वगळता जुलै महिना आला तरी दहा तालुक्यांत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

जिल्ह्यातील दहा तालुक्यांतील ६२ गावे २७० वाड्यावस्त्यांवरील ८२ हजार २६ लोकांना ५५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. यामध्ये माण तालुक्यात ३८ गावे व २४६ वाड्यावस्तीवर ३३ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Tanker Water Supply
Jalgaon Water Stock : जळगाव जिल्ह्यात जलसाठा ५५ टक्क्यांवर

तसेच खटाव तालुक्यात दोन गावांत दोन टँकरद्वारे, फलटण तालुक्यात एक गाव १५ वाड्यावस्त्यांवर तीन टँकरद्वारे, कोरेगाव तालुक्यात एका गावात एका टँकरद्वारे, वाई तालुक्यात सहा गावे तीन वाडीवस्तीवर पाच टँकरद्वारे, पाटण तालुक्यात एका वाडीवस्तीवर एका टँकरद्वारे, जावळी तालुक्यात दोन गावे एका वाडीवस्तीत दोन टँकरद्वारे, महाबळेश्‍वर तालुक्यात सहा गावे एक वाडीवस्तीवर चार टँकरद्वारे, सातारा तालुक्यात एक गाव तीन वाडीवस्तीवर एका टँकरद्वारे, कऱ्हाड तालुक्यात पाच गावात तीन टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.

Tanker Water Supply
Satara Water Supply : सातारा जिल्ह्यात ३० टँकरद्वारे पाणीपुरवठा

२८ विहिरींचे अधिग्रहण
प्रशासनाकडून पाणीटंचाई लक्षात घेऊन संरक्षित पाण्यासाठी २८ विहिरी व २४ बोअरवेलचे अधिग्रहण करण्यात आले आहे. दमदार पाऊस येत नसल्यामुळे शेतातील कामे ठप्प आहेत.

पिण्याच्या पाण्याची भीषण परिस्थिती निर्माण झाल्याने शेतीला पाणी कुठून मिळणार यामुळे शेतकऱ्यांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com