Jalgaon Water Stock : जळगाव जिल्ह्यात जलसाठा ५५ टक्क्यांवर

धुळ्यातील पांझरा, बुराई, मालनगाव, अनेर या प्रकल्पांतील साठाही ५० टक्क्यांखाली आहे. तसेच सोनवद, अमरावती या प्रकल्पांतील साठाही ३० टक्के एवढाच आहे.
Water Stock
Water StockAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशातील प्रमुख प्रकल्पांमध्ये जलसाठा बऱ्यापैकी आहे. परंतु काही मध्यम प्रकल्पांतील जलसाठा (Water Stock) कमालीचा कमी आहे. एकूण ५५ टक्क्यांवर जलसाठा जिल्ह्यात आहे.

जळगाव जिल्ह्यातील गिरणा नदीवरील चाळीसगावनजीकच्या गिरणा धरणातील साठा सुमारे ५९ टक्के एवढा आहे. या प्रकल्पाची साठवण क्षमता १८ टीएमसी आहे. सलग चौथ्या वर्षी हा प्रकल्प १०० टक्के भरला होता.

या प्रकल्पातून जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव, पाचोरा, भडगाव, एरंडोल व धरणगाव तालुक्यात दोन वेळेस रब्बीसाठी आवर्तन सोडण्यात आले आहे.

तसेच नदीतही दोन वेळेस टंचाई निवारणार्थ पाणी सोडण्यात आले आहे. टंचाई निवारणार्थ पाच वेळेस या प्रकल्पातून पाणी जूनपर्यंत सोडले जाईल.

Water Stock
Water Stock : सांगलीतील ८३ प्रकल्पांत ५७ टक्के साठा

या प्रकल्पातून चाळीसगाव, पाचोरा, भडगाव शहराचा पाणीपुरवठा व मनमाड शहरासाठी पाणीपुरवठ्याची जलवाहिनीतही पाणी दिले जात आहे. तापी नदीवरील हतनूर (ता. भुसावळ) येथील हतनूर मध्यम प्रकल्पही १०० टक्के भरला होता.

पण यात ५६ टक्के गाळ आहे. फक्त ४४ टक्के जलसाठा असतो. या प्रकल्पातून रावेर, यावल व चोपडा तालुक्यांत रब्बीसाठी दोनदा आवर्तन सोडण्यात आले आहे.

तर दीपनगर (ता. भुसावळ) येथील औष्णिक विद्युत प्रकल्प, वरणगाव (ता. भुसावळ) येथील आयुध निर्माणी, भुसावळ शहर आणि जळगाव येथील औद्योगिक वसाहतीसाठी देखील पाणी देण्यात येत आहे.

या प्रकल्पात सध्या २७ टक्केच जलसाठा असल्याची माहिती आहे. जामनेर (जि. जळगाव) नजीकच्या वाघूर मध्यम प्रकल्पाची साठवणक्षमता नऊ टीएमसी आहे.

या प्रकल्पातून भुसावळ, जळगाव तालुक्यांसाठी दोन वेळेस रब्बीसाठी आवर्तन सुटले आहे. हा प्रकल्पदेखील १०० टक्के भरला होता. या प्रकल्पातून जळगाव व जामनेर शहरातही पाणीपुरवठा केला जात आहे.

Water Stock
Water Storage : गिरणातील धरणातील साठा ४९ टक्क्यांखाली

जिल्हानिहाय स्थिती अशी

यावलमधील मोर, रावेरातील सुकी, अभोरा, मंगरूळ, चोपड्यातील गूळ, एरंडोलातील अंजनी, पाचोऱ्यातील बहुळा, अग्नावती, चाळीसगावमधील मन्याड, पारोळ्यातील बोरी या प्रकल्पांतील जलसाठाही ५० टक्क्यांवर आहे. यात भोकरबारी प्रकल्प १०० टक्के भरला नव्हता.

त्यातील जलसाठा ३० टक्क्यांखाली आहे. धुळ्यातील पांझरा, बुराई, मालनगाव, अनेर या प्रकल्पांतील साठाही ५० टक्क्यांखाली आहे. तसेच सोनवद, अमरावती या प्रकल्पांतील साठाही ३० टक्के एवढाच आहे.

पुढे धुळ्यातील पांझरा व अनेर प्रकल्पांतून उन्हाळ हंगामासाठीदेखील पाणी दिले जाणार आहे. नंदुरबारमधील दरा, सुसरी या प्रकल्पांतील साठाही ६० टक्के एवढा आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com