Crop Loan : पीककर्ज वितरणात राष्ट्रीयीकृत बँका उदासीन

आजपर्यंत केवळ ५५ टक्क्यांनुसार ४९६ कोटी १३ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०२ टक्के तर ग्रामीण बँकेने १३० टक्के पीककर्ज वाटप केले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

नांदेड : जिल्ह्यात सर्वाधिक शाखा असलेल्या राष्ट्रीयीकृत,(Nationalize Bank) तसेच खासगी बँकांना (Private Bank) खरिपात ८९१.६१ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उदिष्ट दिले होते. परंतु आजपर्यंत केवळ ५५ टक्क्यांनुसार ४९६ कोटी १३ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे. दुसरीकडे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने (District Bank) १०२ टक्के तर ग्रामीण बँकेने १३० टक्के पीककर्ज वाटप केले आहे.

Crop Loan
Crop Loan : मराठवाड्यात कर्जपुरवठ्याचं घोडे अडलेलेच

जिल्ह्यात आजपर्यंत ८१ टक्क्यांनुसार एक लाख ७३ हजार ९३८ शेतकऱ्यांना एक हजार २९४ कोटींचे कर्जवाटप केल्याची, माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

Crop Loan
Crop Damage : दौंडमधील पीक नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

जिल्हास्तरीय बँकर्स कमिटीच्या बैठकीत जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात खरीप हंगाम २०२२ मध्ये शेतकऱ्यांना एक हजार ५८१ कोटी ५९ लाख रुपये, तर रब्बीसाठी ५६३ कोटी ८१ लाख असे एकूण दोन हजार १४५ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट २१ बँकांच्या वेगवेगळ्या शाखांना दिले होते.

Crop Loan
Crop Protection : सूत्रकृमी प्रादुर्भाव टाळण्यासाठी घ्या योग्य खबरदारी

या बाबत तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विपीन तसेच विद्यमान जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज देण्याची सूचना प्रत्येक बैठकीत केल्या होत्या. परंतु राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांनी मात्र पीक वाटपासाठी नेहमी प्रमाणे नकारघंटा दाखविली आहे. जिल्ह्यातील राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांना खरिपासाठी ८९१.६१ कोटींचे पीककर्ज वाटपाचे उदिष्ट दिले होते.

असे असताना आजपर्यंत या बँकांनी ५५ टक्क्यांनुसार ५९ हजार ७८ खातेदारांना ४९६ कोटी १३ लाखांचे कर्जवाटप केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने १०२ टक्क्यांनुसार ५७ हजार २६३ शेतकऱ्यांना ३६३ कोटी २३ लाखांचे पीककर्ज वाटप केले आहे.

तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेला खरिपात ३३४ कोटी ८७ लाखांचे पीककर्ज वाटपाचे उदिष्ट दिले होते. या बँकेने आजपर्यंत १३० टक्क्यांनुसार ५७ हजार ५९७ शेतकऱ्यांना ४३४ कोटी ५४ लाखांचे कर्जवाटप केले आहे.

जिल्ह्यात आजपर्यंत खरिपासाठी १५८१ कोटींच्या उद्दिष्टांपेकी एकूण ८१ टक्क्यांनुसार एक लाख ७३ हजार ९३८ शेतकऱ्यांना एक हजार २९३ कोटी ९० लाख रुपयांचे कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) कार्यालयाकडून मिळाली.

जिल्ह्यातील बँकनिहाय कर्जवाटप स्थिती

(उद्दिष्ट व वाटप रक्कम कोटींत)

बँक कर्ज वाटपाचे उदिष्ट सभासद संख्या वाटप रक्कम टक्केवारी

महाराष्ट्र ग्रामीण बँक ३३४,८७ ५७,५९७ ४३४.५४ १२९.७६

जिल्हा मध्यवर्ती बँक ३५५.११ ५७,२६३ ३६३.१३ १०२.२९

व्यापारी/खासगी बँक ८९१.६१ ५९,०७८ ४९६.१३ ५५.६४

एकूण कर्जवाटप १५८१.५९ १,७३,९३८ १२९३.३८ ८१.८१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com