VSI Awards : ‘व्हीएसआय’चे पुरस्कार जाहीर

शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी होणार वितरण
 VSI Awards
VSI Awards Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
पुणे : मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (Vasantdada Sugar Institute) च्या वतीने २०२१-२२ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या साखर कारखाने, अधिकारी, शेतकरी अशा वर्गातील ११ प्रकारच्या पुरस्कारांची घोषणा इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीप वळसे-पाटील (Dilip WalsePatil) यांनी शुक्रवारी (ता.१३) केली.

पुरस्काराचे वितरण वसंतदादा साखर संस्थेच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभा व पारितोषिक वितरण कार्यक्रमात शनिवारी (ता.२१) सकाळी ११ वाजता इन्टिट्यूटचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली होईल.

या कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सहकारमंत्री अतुल सावे, संस्थेचे विविध संचालक उपस्थित राहतील.

 VSI Awards
Agriculture Award : डॉ. सुरेंद्र काळबांडे यांना उत्कृष्ट कृषी संशोधन पुरस्कार

वसंतदादा साखर संस्था ही दरवर्षी उत्तम कार्यक्षमता राखण्यात यशस्वी झालेल्या सभासद साखर कारखान्यांना प्रोत्साहनपर पुरस्कार देते.

१९९१ -९२ पासून अखंडपणे हे पुरस्कार दिले जात आहेत. २०२१-२२ या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या साखर कारखान्यांसाठी दिला जाणारा कै वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार हा कडेगाव (जि. सांगली) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याला जाहीर झाला आहे.

पुरस्काराचे स्वरूप अडीच लाख रुपये, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे आहे.

 VSI Awards
Gopalratn Award : रविशंकर सहस्रबुद्धे यांना राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार जाहीर

वळसे-पाटील म्हणाले, ‘‘केंद्र सरकारचे साखर निर्यातीचे प्रचलित धोरण हे सहकारी साखर कारखान्यांसाठी मोठे आर्थिक नुकसानीचे ठरू लागले आहे.

सध्याचे हे धोरण धरसोड पद्धतीचे आहे. त्यामुळे कोटा पद्धतीवर आधारित असलेले हे प्रचलित धोरण रद्द करावे आणि सहवीजनिर्मिती (को-जनरेशन) आधार धरून, त्याआधारे साखर निर्यातीचे नवीन धोरण निश्चित करावे.’’

‘‘सध्या राज्यातील १९८ साखर कारखान्यांनी ऊस गाळप सुरू केले आहे. यामध्ये १०१ सहकारी आणि ९७ खासगी साखर कारखान्यांच्या समावेश आहे. आतापर्यंत ५९९.९९ मेट्रिक टन उसाचे गाळप पूर्ण झाले आहे.

गेल्या वर्षी हाच आकडा ५६६.२५ लाख मेट्रिक टन इतके होते. त्यामुळे यंदा येत्या मार्च अखेरपर्यंत उसाचे गाळप पूर्ण होईल.

दरम्यान, यंदा उसाचे उत्पादन, उतारा आणि वजनात मोठी घट झाली आहे. याचा उसाच्या दरावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे,’’ असे संस्थेचे सल्लागार शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.

 VSI Awards
Young Agri Entrepreneur Award : मनीषा खामकर यांना सर्वोत्कृष्ट युवा कृषी उद्योजक पुरस्कार

‘नागपूर उपकेंद्रासाठी ७२ एकर जागा’
‘‘वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे मराठवाडा आणि विदर्भात प्रत्येकी एक उपकेंद्र सुरू करण्यात येत आहे.

यानुसार मराठवाड्यात जालना तर, विदर्भात नागपूर येथे हे उपकेंद्र करण्यात येत आहे.

नागपूर येथील उपकेंद्रासाठी ७२ एकर जमीन खरेदी करण्यात आली आहे,’’ असे शिवाजीराव देशमुख यांनी सांगितले.

२०२१-२२ वर्षातील विभागनिहाय पुरस्कार :
कारखान्यांना देण्यात येणारे पुरस्कार :
कारखाना--- पुरस्काराचे नाव ---बक्षिसाची रक्कम

१) डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखाना, वांगी (ता. कडेगाव, सांगली) --- कै. वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना पुरस्कार---२,५१ हजार रुपये

२) श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखाना, ता. कागल, कोल्हापूर ---कै. विलासराव देशमुख सर्वोत्कृष्ट उद्योजकता पुरस्कार --- १ लाख रुपये

३) दौंड शुगर प्रा. लि. आलेगाव, दौंड, श्री. पाडुरंग सहकारी साखर कारखाना, शिरपूर, सोलापूर विभागून --- कै. डॉ. अप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धन पुरस्कार ---१ लाख रुपये

४) डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी कारखाना, वांगी, ता.कडेगाव, सांगली ---कै. कर्मयोगी शंकररावजी पाटील उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार---१ लाख रुपये

५) जयवंत शुगर्स लि, धावरवाडी, ता. कराड, सातारा ---कै.
रावसाहेब पवार उत्कृष्ट आसवाणी पुरस्कार-- स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक, १ लाख रुपये

६) क्रांतीअग्रणी डॉ. जी.डी. बापू लाड सहकारी साखर कारखाना, कुंडल, ता. पलूस, सांगली --- कै. किसन महादेव ऊर्फ आबासाहेब वीर सर्वोत्कृष्ट पर्यावरण संवर्धन पुरस्कार --- १ लाख रुपये

उत्कृष्ट आर्थिक व्यवस्थापन पुरस्कार :
विभाग --- कारखाना --- पुरस्काराचे स्वरूप

दक्षिण विभाग ---उदगिरी शुगर अॅण्ड पॉवर लि. बामणी, सांगली --- स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्रक

मध्य विभाग ---दौंड शुगर प्रा. लि. आलेगाव, दौंड, पुणे--- स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक

उत्तरपूर्व विभाग ---कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना युनिट नं १,

अंकुशनगर, ता. अंबड, जालना --- स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक

उत्कृष्ट ऊसविकास व संवर्धन पुरस्कार विभागवार :

विभाग --- कारखाना--- पुरस्काराचे स्वरूप

दक्षिण विभाग --- सह्याद्री सहकारी साखर कारखाना, यशवंतनगर, ता. कराड, सांगली---स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक

मध्य विभाग ---श्री. विघ्नहर सहकारी साखर कारखाना, निवृत्तीनगर - शिरोली ता. जुन्नर, पुणे --- स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक

उत्तरपूर्व विभाग -- विलास सहकारी साखर कारखाना, वैशालीनगर - निवळी, ता. लातूर ---स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक

उत्कृष्ट तांत्रिक कार्यक्षमता पुरस्कार विभागवार :

विभाग ---कारखाना--- पुरस्काराचे स्वरूप
दक्षिण विभाग ---कल्लाप्पाआण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी कारखाना, हातकणंगले,

कोल्हापूर (प्रथम पारितोषिक) ---स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक
मध्य विभाग ---नीरा भीमा सहकारी साखर कारखाना, शहाजीनगर, ता. इंदापूर, पुणे (प्रथम पारितोषिक) --- स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक

-माळेगाव सहकारी साखर कारखाना, माळेगाव बु, ता. बारामती, पुणे (द्वितीय पारितोषिक) --- स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक

- लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना, भेंडे, ता. नेवासा, नगर (तृतीय पारितोषिक) --- स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक

उत्तरपूर्व विभाग ---विलास सहकारी साखर कारखाना, तोंडर, ता. उदगीर, लातूर (प्रथम पारितोषिक) -- स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक

- कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखाना, युनिट नं २ , तिर्थपुरी, ता. घनसांगवी, जालना (द्वितीय पारितोषिक) --- स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक

राज्यस्तरीय ऊसभूषण पुरस्कार :

पुरस्काराचे नाव --- पुरस्कार्थीचे नाव --- हंगाम--- बक्षीस रक्कम
१) कै. यशवंतराव चव्हाण पुरस्कार ---राजाराम जाधव, पाडळी, ता. हातकणंगले, कोल्हापूर -- पूर्वहंगामी राज्यात पहिला --- दहा हजार रुपये

२) कै. वसंतराव नाईक पुरस्कार ---अनिता दळवी, केळझर, ता. सटाणा, नाशिक ---सुरू राज्यात पहिला ---दहा हजार रुपये

३) कै. अण्णासाहेब शिंदे पुरस्कार ---बहादूर गुलाब शेख, वायगाव, ता. उदगीर, लातूर ---खोडवा राज्यात पहिला --- दहा हजार रुपये

वैयक्तिक पारितोषिके :
पुरस्काराचे नाव --- पुरस्कार्थीचे नाव --- बक्षीस रक्कम

उत्कृष्ट व्यवस्थापकीय संचालक ---संतोष कुमठेकर ---दहा हजार रुपये
उत्कृष्ट पर्यावरण अधिकारी ---संतोष गव्हाणे---दहा हजार रूपये

उत्कृष्ट कृषी अधिकारी ---विजय मोरे ---दहा हजार रुपये
उत्कृष्ट आसवनी व्यवस्थापक ---मिलिंद चव्हाण ---दहा हजार रुपये

उत्कृष्ट वित्त व्यवस्थापक -- दिलीप लव्हटे ---दहा हजार रुपये
उत्कृष्ट रसायनतज्ञ --- अनिल शिंदे ---दहा हजार रूपये

उत्कृष्ट साखर अभियंता ---रामचंद्र माहुली ---दहा हजार रूपये
‘व्हीएसआय’मधील उत्कृष्ट कामगिरी केलेले अधिकारी, कर्मचारी ---काकासाहेब कोडे, प्रदीप

शिंदे, वंदन घुले, अशोक दगडे ---दहा हजार रूपये

ऊस भूषण पुरस्कार विभागवार :
विभाग --- शेतकरी नाव --- हंगाम
१) दक्षिण विभाग (कोल्हापूर, सांगली, सातारा) ---अकबर मुल्ला, चिंचणी, ता. कडेगाव, सांगली -- पूर्व हंगामात पहिला
- अजित आनंदराव पाटील, कापूसखेड, ता. वाळवा, सांगली --- खोडवा हंगामात पहिला -- स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक
२) मध्य विभाग (नगर, पुणे, सोलापूर, नाशिक) ---दीपाली सोमनाथ हुलगे, बेंबळे, ता. माढा, सोलापूर -- पूर्व हंगामात पहिला
- गोविंद भिकाजी रासकर, पिंपळवाडी, ता. जुन्नर, पुणे -- सुरू हंगामात पहिला
- सत्यवान पोपट चौधरी, गालेगाव, ता. खेड, पुणे --- खोडवा हंगामात पहिला
३) उत्तरपूर्व विभाग (इतर सर्व जिल्हे) सुभाष लिंबाजी भिगडे, देवळाली, ता. जि. उस्मानाबाद -- पूर्व हंगामात पहिला

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com