Success Story : घरोघरी वृत्तपत्रे वाटणारा विशाल बनला ‘सीए’

Latest Marathi News ; घरोघरी वृत्तपत्रे वाटणाऱ्या लिंब (ता. सातारा) येथील विशाल मारुती जगताप यांनी सीए (सनदी लेखापाल) परीक्षेतून यशाला गवसणी घातली.
vishal Jagtap
vishal JagtapAgrowon
Published on
Updated on

Satara News : : घरोघरी वृत्तपत्रे वाटणाऱ्या लिंब (ता. सातारा) येथील विशाल मारुती जगताप यांनी सीए (सनदी लेखापाल) परीक्षेतून यशाला गवसणी घातली. शेतीत राबणाऱ्या आपल्या आई-वडिलांचे त्याने स्वप्न जिद्दीने पूर्ण केले आहे.

लिंब येथील विशाल यांच्या घरची परिस्थिती अत्यंत बेताची. अशा प्रतिकूल परिस्थितीत त्याला शिक्षणाची मोठी आवड होती. आई-वडील शेतात राबत होते.

vishal Jagtap
Agriculture Success Story: सुरुवातीला टोमणे मारली, शेवटी त्यांनीच कौतुक केलं; खडकाळ माळरानावर पठ्यानं फुलवली शेती!

त्यामुळे आपल्या शिक्षणाला मदत व्हावी, यासाठी विशालने लिंब येथील वृत्तपत्र विक्रेते ताजुद्दीन आगा यांच्याकडे सात वर्षे घरोघरी वर्तमानपत्र वाटपाचे देखील काम केले.

अभ्यासात सातत्य, मोठे होण्याची जिद्द, चिकाटी व प्रामाणिक कष्ट घेतले तर यश नक्कीच मिळते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे विशाल हे आहेत. त्यांनी नुकतेच सीए परीक्षेत उज्ज्वल यश मिळवले. साताऱ्यानजीक असलेल्या लिंब या गावातील पहिला सीए बनण्याचा मान त्यांनी मिळवला आहे.

vishal Jagtap
Agriculture Success Story: फळबागेतून मिळवला आर्थिक नफा; शेतकऱ्याने प्रगती कशी साधली?

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी हे यश संपादित केले. यश सातत्याने हुलकावणी देत असताना त्यांनी चिकाटी न सोडता हे यश संपादित केले.

त्यांचे प्राथमिक शिक्षण लिंब येथील जिल्हा परिषद शाळेत, तर माध्यमिक शिक्षण गोडोलीतील विशाल सह्याद्री माध्यमिक विद्यालयात झाले. उच्च माध्यमिक शिक्षण कला व वाणिज्य कॉलेजमध्ये तर उच्च शिक्षण धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स सातारा येथे पूर्ण केले. विशाल यांना सत्यजित भोसले व ओंकार तिखे यांचे मार्गदर्शन लाभले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com