Agriculture Success Story: सुरुवातीला टोमणे मारली, शेवटी त्यांनीच कौतुक केलं; खडकाळ माळरानावर पठ्यानं फुलवली शेती!

Team Agrowon

खडकाळ जमिनीची समस्या

पिकांच्या वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी उत्तम जमिनीची निवड आवश्यक असते. परंतु देशात कोरडवाहू आणि खडकाळ जमिनीचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे शेती करताना शेतकऱ्यांना मोठी अडचण निर्माण होते.

Agriculture Success Story | Agrowon

अडचणीवर मात

परंतु अशा अडचणीवर मात करत जिद्द आणि नियोजन केलं तर या जमिनीवर पीक तर घेता येतच पण तसेच उत्तम उत्पादनही मिळवता येते. त्यासाठी शेतीच्या योग्य नियोजनाची गरज असते.

Agriculture Success Story | Agrowon

दगड गोट्याच्या रानात

शेती क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करु शकतो, असा विश्वास मनाशी बाळगून डोंगर माथ्यावरील दगड गोटे असलेली जमिन लागवड योग्य करण्याचा निर्णय जितेंद्र पवार या तरुणानं घेतला.

Agriculture Success Story | Agrowon

ढोबळ्या मिरचीची लागवड

ढोबळ्या मिरचीची लागवड करण्याचा निर्णय घेतला तेंव्हा लोकांनी हसून टिका टिप्पणी केली परंतु या पठ्ठ्याने जिद्द सोडली नाही.

Agriculture Success Story | Agrowon

आदर्श शेतकरी पुरस्कार

या खडकाळ जमिनीला कसून उत्तम शेती करणाऱ्या साक्री येथील जितेंद्र पवार या मेहनती आणि जिद्दी तरुण शेतकऱ्याला अलीकडेच स्व. वसंतराव नाईक कृषी प्रेरणा (आदर्श शेतकरी) पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं आहे.

Agriculture Success Story | Agrowon

मेहनत फळास आली

जितेंद्र पवार यांच्या शेतीच्या प्रयोगातून त्यांना मिरचीचं चांगलं उत्पादन मिळालं. त्यामुळेच वाळूचे कण रगडीता तेलही गळे ही म्हण जितेंद्र यांना लागू होते.

Farmer | Agrowon
Sitafal | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा