Vinayak Mete : स्व. विनायक मेटेंच्या चळवळीला बळ देणार

यंदा डॉ. ज्योती मेटे यांच्या पुढाकाराने अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (ता. ३१) व्यसनमुक्ती जनजागृती फेरी काढून त्याचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.
Vinayak Mete
Vinayak MeteAgrowon

बीड : दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे (Vinayak Mete) यांनी व्यसनमुक्त अभियानाची (Anti-Addiction Campaign) सुरुवात करून मुख्यमंत्री असताना मला बोलविले; मात्र, त्या वेळी मला येता आले नाही. आज आलो परंतु दुर्दैवाने दिवंगत विनायकराव मेटे आपल्यात नाहीत. मात्र, विनायकराव मेटे यांनी सुरू केलेली चळवळ डॉ. ज्योती मेटे पुढे चालवत आहेत. या चळवळीला सरकार म्हणून राज्यभर बळ देईल, अशी ग्वाही राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी दिली.

दिवंगत लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पुढाकाराने शहरात दरवर्षी ३१ डिसेंबरला व्यसनमुक्ती जनजागृती फेरी व संगीत रजनी घेऊन गोड दूध पाजले जात होते. यंदा डॉ. ज्योती मेटे यांच्या पुढाकाराने अण्णासाहेब पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शनिवारी (ता. ३१) व्यसनमुक्ती जनजागृती फेरी काढून त्याचा समारोप देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत झाला.

Vinayak Mete
Devendra Fadanvis : अकोला हे दळणवळणाचे महत्त्वाचे केंद्र ठरेल ः उपमुख्यमंत्री फडणवीस

या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री अतुल सावे, डॉ. ज्योती मेटे, ‘शिवसंग्राम’चे प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, उपाध्यक्ष राजन घाग, प्रभाकर कोलंगडे, नारायण काशिद, रामहरी मेटे, अशुतोष मेटे, बी. बी. जाधव, सुहास पाटील आदींची उपस्थिती होती.

Vinayak Mete
Vinayak Mete: शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांचे अपघाती निधन

फडणवीस म्हणाले, की विनायकराव मेटे यांनी आपली हयात सामाजिक कामात घालविली. २४ तास ते समाजाचे काम करत. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रातील स्मारक, मराठा आरक्षण हे त्यांच्या मनातील मुद्दे होते.

त्यांनी व्यसनमुक्त समाज व्हावा हा विडादेखील उचलला होता. आता त्यांचा वसा ज्योती मेटे यांनी हाती घेतला आहे. त्यांच्या मागे आपण खंबीरपणे असल्याचे फडणवीस म्हणाले. या वेळी चंद्रशेखर बावनकुळे, अतुल सावे, डॉ. ज्योती मेटे, तानाजी शिंदे यांची भाषणे झाली.

आमदार सुरेश धस, लक्ष्मण पवार, रमेश आडसकर, भीमराव धोंडे, किरण पाटील, अशोक हिंगे, कुंडलिक खांडे, रमेश पोकळे, अक्षय मुंदडा, राजेंद्र मस्के आदी उपस्थित होते. उपस्थितीतांना व्यसनमुक्तीच शपथ देण्यात आली. तत्पूर्वी श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुल येथून जनजागृती फेरी निघाली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी फेरीला हिरवा झेंडा दाखविला. डॉ. ज्योती मेटे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com