Rain Update : विदर्भाला मुसळधारेने झोडपले

राज्यात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने हजेरी लावली आहे. विदर्भात मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणे : राज्यात वादळी वारे, विजा, मेघगर्जनेसह आलेल्या पावसाने (Rainfall With Lightning) हजेरी लावली आहे. विदर्भात मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. गोंदिया, गडचिरोली, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ जिल्ह्यांत १०० मिलिमीटपेक्षा अधिक पावसाची (Rain Update) नोंद झाली. विदर्भासह, कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यातही दमदार पाऊस होत अतिवृष्टीची (Excessive Rain) नोंद झाली. या पावसाने खरीप पिकांचे नुकसान होणार असून, पावसाची दडी असलेल्या भागात पिकांना दिलासा मिळाला आहे.

Rain Update
Monsoon Rain: राज्यात पावसाने दाणादाण

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नद्यांनी पूर रेषा ओलांडली आहे. आंबेरी (ता. कुडाळ) पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे २७ गावांचा संपर्क तुटला आहे. शेकडो एकर भातशेती आणि बागायतीत पुराचे पाणी शिरले आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्यास जिल्ह्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. तेरेखोल, गड, शुक, शांती, निर्मला, पीठढवळ, हातेरी या नद्या ओसंडून वाहत आहेत. कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर सोमवार दुपारपर्यंत कायम राहिल्याने नद्यांची पाणी पातळी वाढू लागली आहे. पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर शहरासह गगनबावडा, चंदगड, आजरा, राधानगरी तालुक्यामध्ये संततधार पाऊस सुरू आहे.

Rain Update
Heavy Rain : मुसळधार पावसाने माणगाव खोऱ्यातील २७ गावांचा संपर्क तुटला

मराठवाड्यातील औरंगाबाद जालना बीड उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यातील मंडळांमध्ये सोमवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांत पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील मंडळात पावसाचा जोर अधिक होता. औरंगाबादमधील एका व जालन्यातील दोन मंडळात अतिवृष्टी झाली. जिल्ह्यातील लाहुकी व देवगिरी नदीला पूर आला. हिंगोली परभणी, जिल्ह्यातील सर्व ८२ मंडळात हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यात पावसाचा जोर होता. हयातनगर (ता. वसमत) मंडलात (८६.५ मिमी) अतिवृष्टी झाली. नांदेड जिल्ह्यातील रविवारी किनवट, माहूर व हिमायतनगर तालुक्यासह १३ मंडळांत अतिवृष्टी झाली. पावसामुळे खरिपातील कापूस तसेच सोयाबीनला दिलासा मिळाला आहे.

वऱ्हाडातील अकोला जिल्ह्यात गेले काही दिवस दडी मारून बसलेल्या पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. बुलडाणा जिल्ह्यात संग्रामपूर, जळगाव जामोद, देऊळगावराजा, मोताळा या तालुक्यांमध्ये वादळासह आलेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान केले. खानदेशात मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू आहे. सर्वत्र हा पाऊस झाला आहे. परंतु यामुळे पूर्वहंगामी कापूस पिकाचे अंशतः नुकसान झाले आहे. ज्वारी, मका, कांदेबाग केळी, सोयाबीन या पिकांना तूर्त दिलासा मिळाला आहे. पाचोरा, जामनेर, एरंडोल, पाचोरा आदी भागात कापूस पीक लोळले आहे.

नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील गिरणा धरणात पाण्याची आवक वाढली आहे. यामुळे धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे नदीत प्रवाही पाणी वाढले आहे. तापी, पांझरा नदी देखील प्रवाही आहे. पुणे शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला. कमी काळात झालेल्या जोरदार पावसाने सर्वदूर पाणीच पाणी झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com