Anil Jadhao
विदर्भात ठिकठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातही चांगला पाऊस झाला. मात्र पावसामुळे पिकांमध्ये असे पाणी साचले होते.
पुणे जिल्ह्यात बहुतांशी भागात जोरदार पाऊस झाला. मुळशी तालुक्यातील पिंरगुट परिसरात झालेल्या पावसाने शेतात पाणी साचले होते.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत असून कुडाळ तालुक्यातील पीठढवळ नदीच्या पुराचे पाणी आजूबाजूच्या बागायतीमधून वाहत आहे.
औरंगाबाद जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली. दूधड, शेकटा परिसरात डाळिंब पिकात दमदार पावसाने असे पाणी साचले.
बुलढाणा जिल्ह्यात संग्रामपूर तालुक्यामध्ये लाडनापुर शिवारात वादळ व पावसामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले. मक्याचे पीक असे जमिनीवर झोपले.
कोल्हापूर जिल्ह्यात पश्चिम भागात संततधार सुरुच आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली.