Israel Agriculture : इस्त्राईलचा विषयच भारी! चक्क घरांच्या भिंतींवर पिकवतात गहू, भातासोबत भाजीपाला

Vertical Farming : जगात पहिल्यांदा इस्रायलमध्ये Vertical Farming चा प्रयोग राबवण्यात आला. शेतीयोग्य जमिनीच्या कमतरतेमुळे, हे आश्चर्यकारक तंत्रज्ञान या देशाने शोधले.
Vertical Farming
Vertical FarmingAgrowon
Published on
Updated on

Agriculture Technology In Israel : हजारे वर्षांपासून आपल्याकडे जमिनीवर शेती करण्याची पद्धत आहे. परंतु सध्या शेती करण्याच्या पद्धतींमध्ये अमुलाग्र बदल होताना दिसतात. दरम्यान इस्त्राईलमध्ये शेती जमिनीवर नव्हे तर भिंतीवर केली जाते.

हे ऐकून तुम्हालाही वेगळे वाटेल पण हे खरे आहे. इस्त्राईलमध्ये गहू, भाताबरोबरच भिंतींवर भाजीपालाही पिकवला जातो. या तंत्राला व्हर्टिकल फार्मिंग म्हणतात, दरम्यान या शेतीचा प्रयोग जगभरातील अनेक ठिकाणी राबवले जात आहेत.

जगात पहिल्यांदा इस्रायलमध्ये Vertical Farming चा प्रयोग राबवण्यात आला. शेतीयोग्य जमिनीच्या कमतरतेमुळे, हे आश्चर्यकारक तंत्रज्ञान या देशाने शोधले. दरम्यान इस्रायल व्यतिरिक्त, इतर अनेक देश देखील जमिनीच्या कमतरतेच्या समस्येपासून मुक्त होऊन हा प्रयोग करण्यास सज्ज होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Vertical Farming
Agriculture Technology : एकोणीस वाण, तेरा यंत्रांसह १९७ कृषी तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता

या शेतीचा वापर करून अनेक कंपन्या अन्नद्रव्यांचे उत्पादन घेत आहेत. ग्रीनवॉल या इस्रायली कंपनीचे संस्थापक पायनियर गाय बार्न्स यांच्या माहितीनुसार, गुगल आणि फेसबुकसारख्या मोठ्या कंपन्या त्यांच्या संपर्कात आहेत. त्यांना इस्रायलच्या धर्तीवर Vertical Farming चा प्रयोग अनेक ठिकाणच्या भिंतींवर करायचा आहे.

Vertical Farming
Agriculture Technology : तंत्रज्ञान वापराचे स्वागत, पण...

भिंतीवरील शेतीचा असा होतो प्रयोग

या तंत्रज्ञानात अगदी लहान रोपे मोठ्या प्रमाणात कुंडीत लावली जातात आणि नंतर ती भिंतीवर उभी केली जातात. भिंतीवर लावलेली छोटी रोपे अगदी व्यवस्थित सुनिश्चित केली जातात. यामुळे झाडे कुंडीतून किंवा भिंतीवरून पडत नाहीत.

तसेच या कुंड्यांच्या सिंचनासाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय धान्य उगवण्यासाठी काही काळ भिंतीबाहेरही कुंड्या काढल्या जातात, नंतर कुंड्या पुन्हा भिंतीवर लावल्या जातात.

इस्रायलनंतर अमेरिका, युरोप आणि चीनमध्येही उभ्या शेतीचे तंत्र वेगाने पसरत आहे. या लागवडीचा सर्वात चांगला फायदा म्हणजे भिंतीवर रोपे ठेवल्याने घरातील उष्मा कमी होतानाच्या नोंदी झाल्या आहेत. तसेच, याचा परिणाम सभोवतालच्या परिसरातही होताना दिसून आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com