Agriculture Technology : एकोणीस वाण, तेरा यंत्रांसह १९७ कृषी तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता

Mahatma Phule Agriculture University : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तीनदिवसीय ५१ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचा (जॉइंट ॲग्रेस्को) शनिवारी (ता. २७) समारोप झाला.
Agriculture Technology
Agriculture TechnologyAgrowon
Published on
Updated on

Nagar News : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील तीनदिवसीय ५१ व्या संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीचा (जॉइंट ॲग्रेस्को) शनिवारी (ता. २७) समारोप झाला.

तीन दिवसांच्या सादरीकरण व अन्य चर्चेनंतर राज्यातील चारही कृषी विद्यापीठांनी संशोधित केलेल्या १९ वेगवेगळी वाण, तेरा शेती यंत्रे आणि १९७ कृषी तंत्रज्ञान शिफारशींना समितीने मान्यता दिली.

महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने राहुरी कृषी विद्यापीठ येथे तीनदिवसीय संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीची ५१ वी बैठक झाली.

दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत समितीच्या बैठकीचा समारोप झाला.

Agriculture Technology
Tur Cultivation : तूर लागवडीसाठी पक्वता कालावधीनुसार वाण निवड

कृषी आयुक्त सुनील चव्हाण, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, परभणी कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी, अकोला कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, कृषी परिषदेचे संशोधन संचालक डॉ. हरिहर कौसडीकर, राहुरीचे संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, परभणीचे संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्यासह विस्तार शिक्षण संचालक, अधिष्ठाता, कुलसचिव, चारही कृषी विद्यापीठांचे संचालक उपस्थित होते.

संयुक्त कृषी संशोधन आणि विकास समितीच्या बैठकीत २० संशोधित वाण, १३ यंत्रे, २३३ शिफारशी सादर करण्यात आल्या होत्या.

तीन दिवस बैठकीत यावर चर्चा, सादरीकरण करण्यात आल्यानंतर चारही कृषी विद्यापीठांच्या १९ वाण, १३ कृषी यंत्रे आणि १९७ कृषी तंत्रज्ञान शिफारशींना मान्यता देण्यात आली. समारोप कार्यक्रमात वर्षभरात सेवानिवृत्त होणाऱ्या २५ शास्त्रज्ञांचा सत्कार करण्यात आला.

मान्यता देण्यात आलेले वाण

महात्मा फुले कृषी विद्यापीठ

१) भात- (फुले कोलम व्ही.डी.एन.-१८३२) ः हा अधिक उत्पादन देणारा निमगरवा, आखूड बारीक दाण्याचा वाण पश्‍चिम महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित. २) भात- (फुले सुपर पवना आयजीपी-१३-१२-१९) ः हा अधिक उत्पादनक्षम, बुटका, निमगरवा, सुवासिक, लांबट बारीक दाण्यांसह तांदळाची उत्तम गुणवत्ता असलेला वाण पश्‍चिम महाराष्ट्रात खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित.

३) मका-(फुले उमेद : क्यूएमएच-१७०१) ः हा अधिक धान्य उत्पादन देणारा आणि मध्यम कालावधीत पक्व होणारा संकरित वाण महाराष्ट्र राज्यात खरीप हंगामात लागवडीसाठी. ४) मका- (फुले चॅम्पियन क्यूएमएच-१८१९) ः हा अधिक उत्पादन देणारा, लवकर पक्व होणारा संकरित वाण महाराष्ट्रामध्ये खरीप हंगामात लागवडीसाठी प्रसारित. ५) ऊस- (फुले १३००७) ः हा पिकाचा वाण राष्ट्रीय पातळीवर द्वीपकल्पीय प्रदेशासाठी प्रसारित,

६) मका (फुले उमेद क्यूएमएच १७०१) ः अधिक धान्य देणारा, मध्यम कालावधीत पक्व होणारा संकरित वाण. खरीप लागवडीसाठी प्रसारित. ७) डाळिंब (सोलापूर अनारदाना) ः उच्च उत्पादनक्षमता, ट्रायटेबल आम्लता, अॅन्थोसायनीस अधिक. ८) मिरची (पीबीएनसी १७) ः अधिक उत्पादन देणारा, हिरव्या मिरचीसाठी मराठवाडा विभागात खरिपात लागवडीसाठी फायदेशीर.

बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ

१) भात - (कोकण संजय केजेटीआर ३) ः हा वाण अधिक उत्पादन देणारा. मध्यम उंच, लांबट बारीक दाणा. महाराष्ट्रात लागवडीसाठी प्रसारित. २) भात- (ट्रॉम्बे कोकणखारा बीएआरसी केकेव्ही १६) ः हा वाण अधिक उत्पादन, बुरका, मिगरवा, लांबट, बारीक दाणा, उत्तम तांदूळ.

राज्याच्या किनारपट्टीलगत क्षारयुक्त जमिनीत लागवडीसाठी प्रसारित ३) वाल (कोकण शारदाहा डीपीएलवायबी ९) ः वालाच्या लांब शेंगा, अधिक उत्पादन देणारा वाण.

Agriculture Technology
Soybean Varieties : सोयाबीनचे विविध वाण

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी

१) ज्वारी (पीव्हीके १५०९ परभणी शक्ती) ः महाराष्ट्रात रब्बीत लागवडीसाठी प्रसारित. २) हरभरा (बीडीएनजी २०१८-१६) ः अधिक उत्पादन देणारा, यांत्रिकीरणासाठी सुलभ, टपोरा दाणा. मराठवाड्यासाठी प्रसारित. ३) तीळ (टीएलटी १०) ः बियांचे व तेलाचे अधिक उत्पादन देणारा वाण, खरीप व उन्हाळी हंगामासाठी प्रसारित.

४) कापूस (एमएच ६७७) ः अमेरिकन कापसाचा सरळ वाण, अधिक उत्पादन देणारा, रस शोशणाऱ्या किडीस, जिवाणू जन्य करपा, बुरशीजन्य ठिपके या रोगांना सहनशील, कोरडवाहू भागासाठी प्रसारित. ५) टोमॅटो (पीबीएनटी २०) ः अधिक उत्पादन देणारा मराठवाडा विभागात रब्बी हंगामासाठी प्रसारित.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

१) राळा (बीएफटीएम ८२) ः धान्य, चारा उत्पादन देणारा, करप, तांबेरा रोगास सहनशील. खरिपात लागवडीसाठी प्रसारित. २) मका (आरंभ बीएमएच १८) ः अधिक धान्य, कडबा उत्पादन देणारा, मध्यम कालावधीत उत्पादित होणारा खरिपासाठी प्रसारित. ३) सूर्यफूल (पीडीकेव्ही एसएच ९६४) ः बियांचे व तेलाचे अधिक उत्पादन देणारा संकरित वाण, मध्यम कालावधीत पक्व होतो.

अल्टरनेरिया रोगास, तुडतुडे किडीस प्रतिकारक. ४) कवठ (प्रताप एकेडब्ल्यू ए १), : नियमित फळधारणा देणारा, मोठे फळ, अधिक उत्पादन क्षम, अधिक गर असलेला वाण महाराष्ट्रातील कोरड्या व उष्ण हवामान असलेल्या भागात लागवडीसाठी प्रसारित. ५) लसूण (पूर्णा एकेजी ०७) ः अधिक उत्पादन देणारा, पांढऱ्या शुभ्र रंगाचे जास्त विद्राव्य घनपदार्थांचे प्रमाण, दीर्घ काळ साठवणुकीत कमीत कमी नुकसान.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com