

पुसद, जि. यवतमाळ : वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान (Vasantrao Naik Smruti Pratishthan) पुसदच्या वतीने राज्यातील प्रयोगशील शेतकरी व कृषी शास्त्रज्ञांना देण्यात येणारे ‘वसंतराव नाईक कृषी पुरस्कार’ (Vasantrao Nail Agriculture Award) जाहीर करण्यात आले आहेत. माजी मुख्यमंत्री व हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या ४३ व्या स्मृतिदिन सोहळ्यात गुरूवारी (ता. १८) या पुरस्कारांचे वितरण होईल.
बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सुधाकर नाईक प्रेक्षागृहात दुपारी सव्वा बारा वाजता हा सोहळा होईल. अध्यक्षस्थानी यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे राहतील. प्रमुख अतिथी म्हणून हवामान अभ्यासक पंजाबराव डख व हळद पीक तज्ज्ञ डॉ. जितेंद्र कदम उपस्थित राहतील. शाल, श्रीफळ, स्मृती मानचिन्ह व सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कारप्राप्त शेतकरी आणि शास्त्रज्ञ
पश्चिम महाराष्ट्र ः प्रियदर्शनी मानकर, (तळेगाव दाभाडे, जि. पुणे, गुलाब उत्पादक शेतकरी), संदीप घोले, (पाटस, ता. दौड जि. पुणे. कांदा वाण संशोधक शेतकरी) आनंदराव शिंदे, (आनंद कृषी पर्यटन केंद्र, बोरगाव ता. जि. सातारा. कृषी पर्यटन)
मराठवाडा ः नितीन सावंत (जागजी, जि. उस्मानाबाद. सफरचंद व ड्रॅगन फ्रूट उत्पादक शेतकरी), अनुप मोरे (मुदखेड, जि. नांदेड. सोयाबीन, हळद उत्पादक शेतकरी)
उत्तर महाराष्ट्र ः दीपक पाटील (माचला ता. चोपडा, जि. जळगाव. केळी व कापूस उत्पादक शेतकरी)
कोकण ः देवराई कृषी समूह (मु .पो. कर्ली, देवरुख, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी. सामुहिक बागायतीचे यशस्वी मॉडेल )
विदर्भ ः प्रवीण गट्टाणी (सीताफळ, पेरू, आंबा फळबाग, श्री संत खप्ती शेतकरी पुरुष बचत गट (वेणी खुर्द, ता. पुसद, जि. यवतमाळ. (मिनी दाळमिल, सेंद्रिय दाळीचे पॅकिंग विक्री), अमोल बोडखे (लोणी, ता. पुसद, जि. यवतमाळ. विक्रमी टरबूज उत्पादन )
कृषी शास्त्रज्ञ ः डॉ. मनोज माळी, हळद संशोधन केंद्र, कसबे डिग्रज, जि. सांगली, डॉ. शिवाजी म्हेत्रे, सोयाबीन पैदासकार,
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी.
दुपारच्या सत्रात डॉ. जितेंद्र कदम हे हळद पिकावर मार्गदर्शन करतील. स्वागताध्यक्ष माजी राज्यमंत्री डॉ. एन. पी. हिराणी, माजी मंत्री मनोहर नाईक, माजी आमदार विजय पाटील-चोंढीकर, माजी राज्यमंत्री अविनाश नाईक, प्रा. गोविंद फुके, आमदार निलय
नाईक, आमदार इंद्रनील नाईक यांचे मार्गदर्शनाखाली या सोहळ्याची तयारी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.