Urea Fertilizer : नांदेड जिल्ह्यात युरिया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध

Fertilizer stock : शेतकऱ्यांनी गरजेनुसार व कृषी विद्यापीठाच्या शिफारस मात्रानुसार पिकांना लागणाऱ्या खतांची खरेदी करावी. जिल्ह्यात आज रोजी युरिया खताचा सहा हजार ६८० टन खतसाठा उपलब्ध आहे.
Fertilizer
FertilizerAgrowon

Nanded News : बाजारात युरिया खत मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी युरिया खताची काळजी करू नये. तसेच रासायनिक खत खरेदी करताना खत विक्रेते शेतकऱ्यांना इतर निविष्ठा खरेदीची सक्ती करीत असल्यास उपविभागीय कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद, तालुका कृषी अधिकारी, कृषी अधिकारी पंचायत समिती यांच्याकडे तक्रार नोंदवावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

जिल्ह्यात सध्या खरीप हंगाम पेरणीचे कामे जवळपास पूर्ण झाले आहेत. त्यामुळे शेतकरी खते खरेदीसाठी बाजारात चाचपणी करीत आहेत. शेतकऱ्यांनी गरजेनुसार व कृषी विद्यापीठाच्या शिफारस मात्रानुसार पिकांना लागणाऱ्या खतांची खरेदी करावी. जिल्ह्यात आज रोजी युरिया खताचा सहा हजार ६८० टन खतसाठा उपलब्ध आहे. पुढील सहा ते सात दिवसांत पाच हजार ८०० टन खतसाठा उपलब्ध होणार आहे.

Fertilizer
Bogus Fertilizer Supply : बोगत खत पुरवठा प्रकरणी गुजरातच्या बड्या कंपनीचा राज्य परवाना रद्द

त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही भूलथापाला बळी न पडता युरिया खताची काळजी करू नये. शेतकऱ्यांनी एकात्मिक अन्न व्यवस्थापन अंतर्गत समाविष्ट खतांचा संतुलित वापर करावा. विद्यापीठाच्या शिफारस मात्रेनुसार खत नियोजन करताना कमी खर्चात खतांचे नियोजन होईल याची काळजी घ्यावी.

विक्रेते शेतकऱ्यांना इतर निविष्ठा खरेदीची सक्ती करीत असल्यास जिल्हा तक्रार निवारण कक्ष संपर्क क्रमांक ९६७३०३३०८५, ०२४६२-२८४२५२ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

Fertilizer
Fertilizer Linking : लिंकिंग केल्यास खत कंपनी मालकावर गुन्हा

जिल्ह्यात सहा हजार ६८० टन युरियाचा साठा

जिल्ह्यात आरसीएफचा युरिया दोन हजार २५० टन साठा आहे. तर संभावित येणारा रॅक कृभको दोन हजार ३०० टन आहे. इफ्को दोन हजार टन साठा उपलब्ध आहे. संभावित येणारा रॅक नागार्जुन दोन हजार २०० टन आहे.

आयपीएल एक हजार ६०० टन साठा उपलब्ध असून, संभावित येणारा रॅक चंबळ एक हजार ३०० टन साठा आहे. संरक्षित केलेल्या युरिया साठ्यापैकी वितरित साठा ८८० टन आहे. आज रोजी एकूण उपलब्ध साठा सहा हजार ६८० असून, संभावित येणारा रॅक साठा पाच हजार ८०० आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी युरिया खताची काळजी करू नये असे कृषी विभागाने कळविले आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com