Shasan Aplya Dari : एकही पात्र लाभापासून वंचित राहू नये यासाठी दक्षता घ्यावी

Agriculture Scheme : ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम येत्या १० सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे होत आहे. जिल्ह्याला ७५ हजार शासकीय योजनांचे लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे.
Shasan Aplya Dari
Shasan Aplya DariAgrowon

Solapur News : ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम येत्या १० सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे होत आहे. जिल्ह्याला ७५ हजार शासकीय योजनांचे लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. तरी या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक शासकीय विभाग प्रमुखांनी त्यांच्या विभागाच्या अंतर्गत असलेल्या विविध शासकीय योजनांच्या लाभापासून एकही पात्र लाभार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी मंगळवारी (ता. २९) दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित ‘शासन आपल्या दारी’ पूर्वतयारी आढावा बैठकीत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. या वेळी निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे पंढरपूरचे कार्यकारी अभियंता अमित निमकर, सहायक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे तसेच दूरदृश्‍यप्रणालीद्वारे प्रांताधिकारी गजानन गुरव, जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका आशिष लोकरे व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’ अभियानात विविध दाखल्यांचे वाटप

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, की शासन आपल्या दारी कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रत्येक तालुक्याला बारा हजार लाभार्थी निवडीचे उद्दिष्ट देण्यात आलेले होते. सर्व संबंधित प्रांत अधिकारी व तहसीलदार यांनी निवडलेल्या लाभार्थ्यांचे संपूर्ण नाव पत्ता व मोबाइल क्रमांकासह यादी विहित प्रपत्रात भरून प्रशासनाला सादर करावी.

Shasan Aplya Dari
Shasan Aplya Dari : ‘शासन आपल्या दारी’वर शेतकऱ्यांची टीका

दिनांक १ एप्रिल २०२३ पासून शासकीय योजनेचा लाभ दिलेल्या लाभार्थ्यांची नावे पाठवावीत. आपल्या अधिनस्त अधिकारी-कर्मचाऱ्यांनी गावोगावी जाऊन सर्वेक्षण केलेले व योजनेसाठी पात्र असलेला एकही लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये, असे त्यांनी सांगितले.

अकरा तालुक्यांतील विविध गावांमधून पंढरपूर येथील ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमासाठी जवळपास ३० ते ३५ हजार लाभार्थी येण्याचे नियोजन करण्यात येत आहे. त्या अनुषंगाने पंढरपूर येथील कोर्टी- वखारी रस्ता, गट क्रमांक २२४ येथे हा कार्यक्रम होणार असून, यासाठी जलरोधक मंडप, बॅरेकेटिंग व अन्य कामकाज तात्काळ सुरू करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने खबरदारी घ्यावी असे निर्देशही त्यांनी दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com