Tur Sowing : खानदेशात तूर लागवड वाढणार

Kharif Sowing : खानदेशात यंदा पाऊस लांबला आहे. कमी पाणी व उशिरा पेरणी करूनही बऱ्यापैकी उत्पादन देणारे पीक म्हणून आता शेतकरी तूर लागवडीकडे वळतील, असे दिसत आहे.
Tur Sowing
Tur SowingAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : खानदेशात यंदा पाऊस लांबला आहे. कमी पाणी व उशिरा पेरणी करूनही बऱ्यापैकी उत्पादन देणारे पीक म्हणून आता शेतकरी तूर लागवडीकडे वळतील, असे दिसत आहे.

सोयाबीन, कापसाखाली कमी होणाऱ्या क्षेत्रात तूर लागवड होईल. अनेकांनी अद्याप कापूस, सोयाबीन बियाण्याची खरेदी टाळली आहे. कारण पाऊस हवा तसा नाही. काहींनी जोखीम घेवून कापूस लागवड मागील दोन दिवसात केली आहे.

परंतु अनेक शेतकऱ्यांनी जोरदार पाऊस आल्याशिवाय लागवड न करण्याचा निर्णय घेतला आहे. खानदेशात कापसाची सर्वाधिक साडेआठ लाख हेक्टरवर लागवड अपेक्षित आहे. यात कोरडवाहू कापसाखालील क्षेत्र सव्वासात लाख हेक्टर राहील, असा अंदाज होता. तर सोयाबीनची पेरणीदेखील ३० ते ३५ हजार हेक्टरवर अपेक्षित होती. परंतु या दोन्ही पिकांची पेरणी रखडत सुरू आहे. कारण पाऊस समाधानकारक नाही.

Tur Sowing
Tur Market Rate : सरकार स्टाॅकमधील तूर विकणार; भाव कमी होतील का?

कुठेही मागील तीन ते चार दिवसात एकाच दिवसात ३० ते ४० मिलीमीटर पाऊस झालेला नाही. फक्त पावसाळी वातावरण व मध्यम ते हलका पाऊस, अशी स्थिती आहे. यामुळे अनेकांनी कापूस, सोयाबीनची लागवड टाळली आहे. पेरणीला विलंब होत आहे. पण तूर लागवड जुलैमध्ये करता येणार आहे. तुरीचे दर मागील वेळेस साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल, असे होते.

शिवाय उशिरा लागवड व कमी पावसात तूर पीक बऱ्यापैकी येते. बाजारात हलकी, मध्यम जमीन, काळ्या कसदार जमिनीत लागवडीसह उशिरा येणाऱ्या वाणांची उपलब्धतादेखील आहे. यामुळे शेतकरी तूर पिकाकडे वळतील, असे दिसत आहे. खानदेशात तुरीची लागवड आंतरपीक म्हणून अधिक केली जाते. फक्त मुक्ताईनगर, रावेर, बोदवड या भागात मुख्य पीक म्हणून तूर लागवड केली जाते.

Tur Sowing
Tur Market : विदर्भात तूर ९ हजार ६०० रुपयांवर

परंतु यंदा मुख्य पीक म्हणून तूर लागवड सर्वत्र असणार आहे. कापूस, सोयाबीनच्या तुलनेत तुरीचा खर्च कमी आहे. शिवाय उत्पादन व उत्पन्नही बऱ्यापैकी आहे. काही कंपन्यांनी आपले बिजोत्पादन क्षेत्र या भागात तयार केले आहे.

सिंचनासाठी कमाल शेतकऱ्यांनी ठिबकचा अवलंब केला आहे. मागील वेळेस ठिबकवरील तूर पिकाचे एकरी आठ ते नऊ क्विंटल उत्पादन हाती आले होते. तरही बऱ्यापैकी मिळाले होते. शिवाय जमीन सुपीकतेलाही आधार मिळाला. यामुळे यंदाही शेतकरी तूर पिकाकडे वळत आहेत, असे दिसत आहे.

खानदेशात तूर अडीच ते तीन हजार हेक्ट

दरवर्षी खानदेशात अडीच ते तीन हजार हेक्टरवर तूर असते. यंदा ही लागवड पाच ते सहा हजार हेक्टरवर जाऊ शकते. जळगाव जिल्ह्यातील रावेर, मुक्ताईनगर, बोदवड भागात अनेक शेतकऱ्यांनी आगाप तूर पिकाची लागवड जूनच्या मध्यातच केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com