Tur Processing : तुरीचे उत्पादन ५० टक्क्यांवर ; प्रक्रिया उद्योग ठप्प

Dal mill : देशात कच्च्या तुरीची उपलब्धता यंदा कमी आहे. त्याचा फटका प्रकिया उद्योगांना बसला आहे. देशभरात सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक उद्योग बंद असल्याची भीती या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्‍त केली आहे.
dal mill
dal mill
Published on
Updated on

Nagpur News : देशात कच्च्या तुरीची उपलब्धता यंदा कमी आहे. त्याचा फटका प्रकिया उद्योगांना बसला आहे. देशभरात सरासरी ५० टक्क्यांपेक्षा अधिक उद्योग बंद असल्याची भीती या क्षेत्रातील जाणकारांनी व्यक्‍त केली आहे. याच कारणामुळे देशांतर्गत बाजारपेठेत तुरीचे दर सातत्याने वाढत असल्याचाही दावा करण्यात आला आहे.

dal mill
Tur Production : तुरीचे हेक्टरी सव्वानऊ क्विंटलचे उत्पादन

देशभरात सुमारे चार दशलक्ष हेक्‍टरवर तुरीखालील क्षेत्र आहे. तेलंगणा, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, तमिळनाडू, ओडिशा, छत्तीसगड, गुजरात हे तूर उत्पादक राज्य आहेत. मात्र त्यानंतर सुद्धा देशाची गरज भागत नसल्याने तुरीची मागणी वाढते आणि दरही वाढतात, अशी स्थिती दरवर्षी राहते. परिणामी केंद्र सरकारला तूर आयातीचा निर्णय घ्यावा लागला. गेल्या हंगामात तुरीला संततधार पावसाचा फटका बसला. परिणामी किडरोग वाढले आणि उत्पादकता प्रभावित झाली. त्यातच देशांतर्गत व्यापाऱ्यांनी देखील साठेबाजी केल्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्यामुळेच सुरुवातीला आठ ते नऊ हजार रुपये असलेले तुरीचे दर आता ११५०० रुपयांवर पोचले आहेत.

गेल्या हंगामात तुरीची उत्पादकता प्रभावित झाली. परिणामी यंदा मागणी अधिक असल्याने दर तेजीत आहेत. महागडा कच्चा माल घेऊन त्यावर प्रक्रिया करून विक्री शक्‍य होत नाही. परिणामी देशभरात ५० टक्क्यां‍पेक्षा अधिक डाळींवर प्रक्रिया करणारे उद्योग बंद आहेत. देशभरात सरासरी ७ हजार ५०० ते ८ हजारांवर प्रक्रिया उद्योग असतील. अकोला हे दालमिल उद्योगाचे महाराष्ट्रातील मोठे केंद्र आहे. या ठिकाणी ३०० पेक्षा अधिक दालमिल आहेत. -
रूपेश राठी, सदस्य, ऑल इंडिया दालमिल असोसिएशन, अकोला.
dal mill
Tur Market : अकोल्यात तुरीचा सरासरी दर साडेनऊ हजारांवर

कळमनामध्ये दहा हजार रुपयांचा दर

नागपूरच्या कळमना बाजार समितीत तुरीला सरासरी दहा हजार रुपयांचा दर मिळत आहे. मध्यप्रदेशातील काही बाजार समित्यांमध्ये मात्र ८ ते ९ हजार रुपयांचा दर तुरीला मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले. खरगोन बाजार समितीत मंगळवारी (ता.२२ ) ८ हजार ८५० रुपये असा दर होता. तर आवक ३७ क्‍विंटल इतकी अत्यल्प होती. दरम्यान देशांतर्गत बाजारात हमीभावापेक्षा अधिकचा दर तुरीला मिळत असल्यामागे प्रक्रिया उद्योजकांची वाढती मागणी हे कारण दिले जात आहे.

तुरीची उपलब्धता नसल्याने अनेक प्रक्रिया उद्योग एका शिफ्टमध्ये सुरु आहेत तर ५० टक्‍केपेक्षा अधिक बंद आहेत. काहींनी उद्योगस्थळी बदल करीत हरभरा प्रक्रियेवर भर दिला आहे. देशात हरभरा, मूग, मसूर व इतर शेतीमालाची उपलब्धता आहे. कॅनडा, ऑस्ट्रेलियातून मसूर देशात दाखल झाली आहे. वर्गीकरण करता ८० टक्‍के तूर, उडीद तर २० टक्‍के उद्योग हे इतर डाळवर्गीय शेतीमालावर प्रक्रिया करणारे आहेत. परिणामी तूर उपलब्धतेचा मोठा परिणाम उद्योगांवर झाला आहे.
- सुरेश अग्रवाल, अध्यक्ष, ऑल इंडिया दालमिल असोसिएशन.

सर्वाधिक दालमिल असलेली राज्ये

महाराष्ट्र ः १२००

मध्यप्रदेश ः ८८०

राजस्थान ः ७९०

गुजरात ः ७४०

कर्नाटक ः ७६३

छत्तीसगड - ७१९

(स्त्रोत ः ऑल इंडिया दालमिल असोसिएशन)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com