Tur Production : तुरीचे हेक्टरी सव्वानऊ क्विंटलचे उत्पादन

राज्यात तुरीचे ११ लाख ७५ हजार हेक्टरवर यंदा पेरणी झाली झाली होती. त्यात लातूर, नांदेड, नगर, वाशीम, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यांत तुरीचे क्षेत्र अधिक होते.
Tur Production
Tur ProductionAgrowon

Tur Market Update नगर ः जिल्ह्यात यंदा तुरीचे (Tur Production) हेक्टरी सरासरी ९ क्विंटल २८ किलोचे उत्पादन निघाले आहे. एकरी पावणेचार क्विंटलचे उत्पादन झाले आहे. यंदा श्रीगोंदा, श्रीरामपूर राहात्यात उत्पादन अधिक आहे.

संगमनेरला सर्वात कमी उत्पादन आहे. यंदा जिल्ह्यात तुरीवर वांझ, मर रोगाचा (Tur Wilt Disease) काही भागात प्रादुर्भाव झाला होता. त्याचाही उत्पादनाला फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.

राज्यात तुरीचे ११ लाख ७५ हजार हेक्टरवर यंदा पेरणी झाली झाली होती. त्यात लातूर, नांदेड, नगर, वाशीम, बुलडाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, नागपूर जिल्ह्यांत तुरीचे क्षेत्र अधिक होते. कृषी विभागाने केलेल्या पीककापणी प्रयोगातून यंदाच्या तुरीचे नगर जिल्ह्यातील सरासरी उत्पादन निश्‍चित झाले आहे.

Tur Production
Tur Market : तुरीचे दर पाडण्यात सरकार यशस्वी होईल का?

त्यानुसार सरासरी ९ क्विंटल २८ किलोचे उत्पादन निघाले आहे. यंदाचे उत्पादन पाहता एकरी पावने चार क्विंटलचे उत्पादन निघाले आहे. गेल्या वर्षी यापेक्षाही कमी म्हणजे हेक्टरी ८ क्विंटल २३ किलो उत्पादन निघाले होते. यंदा नगर जिल्ह्यात सर्वाधिक श्रीगोंदा तालुक्यात हेक्टरी १५ क्विंटल ५२ किलो उत्पादन निघाले आहे.

Tur Production
Tur Rate : तुरीला मराठवाडा आणि विदर्भाच्या बाजारात काय दर मिळतोय?

नगरला १२ क्विंटल ८ किलो, श्रीरामपूरला १२ क्विंटल ४१ किलो, राहाता तालुक्यात ११ क्विंटल १५ किलो उत्पादन निघाले आहे.

कर्जतला ८ क्विंटल ८२ किलो, जामखेडला ९ क्विंटल ९५ किलो, शेवगावला ९ क्विंटल ४६ किलो, पाथर्डीला ८ क्विंटल ८३ किलो, नेवाशाला ८ क्विंटल ५ किलो, राहुरीत ९ क्विंटल १२ किलो उत्पादन निघाले आहे.

या तुलनेत संगमनेर, कोपरगाव तालुक्यात अल्प उत्पादन आहे. या तालुक्यात तुरीचे उत्पादनही कमी आहे. यंदा निघालेल्या तुरीच्या उत्पादनाचा विचार करता यंदा तुरीचे पीक तोट्यातच असल्याचे दिसून येत आहे.

मर, वांझचा परिणाम

नगरसह राज्यातील अनेक भागांत यंदा तुरीवर सुरुवातीच्या काळात वांझ, मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. ज्या भागात उपाययोजना केल्या तेथे तुरीचे पीक चांगले आले. कर्जत तालुक्यात हा रोग आढळून आला होता.

त्यानुसार या भागात कृषी अधिकारी पद्मनाभ मस्के यांच्या पुढाकारातून केलेल्या उपाययोजनांमुळे तूर पीक वाचवता आले. मात्र राज्यातील विविध भागांत मर, वांझ रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उत्पादनात फटका बसला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com