Wheat Production
Wheat ProductionAgrowon

Wheat Production : आदिवासी शेतकरी गहू उत्पादनात राज्यात प्रथम

२०२१-२२ च्या रब्बी हंगामात चिखलदरा तालुक्यातील पलश्‍या येथील नंदा काल्या चिमोटे हे आदिवासी शेतकरी राज्यस्तरावर गव्हाच्या उत्पादनात प्रथम आले आहेत.

Amravati News २०२१-२२ च्या रब्बी हंगामात (Rabi Season) चिखलदरा तालुक्यातील पलश्‍या येथील नंदा काल्या चिमोटे हे आदिवासी शेतकरी (Tribal Farmer) राज्यस्तरावर गव्हाच्या उत्पादनात (Wheat Production) प्रथम आले आहेत. तर खारतळेगाव येथील सचिन क्षीरसागर यांनी हरभरा उत्पादनात (Chana Production) राज्यात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.

नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून उत्पादकतेत वाढ करणाऱ्या प्रयोगशील शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाकडून पीक स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये जिल्हा, विभाग व राज्यस्तर अशा घटकांचा समावेश करण्यात आला.

Wheat Production
Wheat Production: गव्हाचा प्रमुख निर्यातदार असणाऱ्या भारतावर आता आयातीची वेळ येणार?

रब्बी पिकांमध्ये ज्वारी, गहू, हरभरा व करडई या पिकांसाठी पीकस्पर्धा घेण्यात आली. पीकनिहाय प्राप्त उत्पादकतेच्या आकडेवारीनुसार सर्वसाधारण व आदिवासी गटातील शेतकऱ्यांचे गुणानुक्रमान्वये विजेते घोषित करण्यात आले.

Wheat Production
Wheat Production : गहू उत्पादन सरकारच्या उद्दिष्टापेक्षा कमीच राहणार

२०२१-२२ च्या रब्बी हंगामात आदिवासी गटातून चिमोटे यांनी हेक्टरी ५६ क्विंटल गहू घेतला. राज्यात सर्वाधिक उत्पादन घेणारे ते पहिले शेतकरी ठरले आहेत. तर नाशिक जिल्ह्यातील धोंडेगाव येथील सोमनाथ बेंडकोळी यांनी ५४.३५ व नंदूरबार जिल्ह्यातील नितीन वसावे यांनी ५२.४४ क्विंटल हेक्टरी उत्पादन घेतले आहे. त्यांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाला आहे.

हरभरा उत्पादनात मदनगोपाल भोयर प्रथम

राज्यात हरभऱ्याचे सर्वाधिक उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांत भंडारा जिल्ह्यातील उसरीपार येथील मदनगोपाल भोयर यांनी हेक्टरी ६८.४० उत्पादन घेत पहिला क्रमांक मिळविला.

तर द्वितीय क्रमांक याच जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथील विक्रांत मोहतूरे यांनी ६२.५० क्विंटल उत्पादन घेत मिळविला आहे.

तर अमरावती जिल्ह्यातील खारतळेगाव येथील सचिन क्षीरसागर यांनी हेक्टरी ६१ क्विंटल उत्पादन घेत तृतीय क्रमांक पटकाविला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com