
पुणे : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान २०२२-२३ (Integrated Horticulture Development Mission 2022-23) अंतर्गत पुरंदर तालुक्यातील जाधववाडी येथील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीक संशोधन केंद्र (All India Coordinated Dryland Fruit Research Center) येथे प्रत्यक्ष शेतावरील प्रशिक्षण कार्यक्रम नुकताच घेण्यात आला होता.
या वेळी फलटण व वाई उपविभागातील शेतकरी सहभागी झाले होते. प्रशिक्षणप्रसंगी कृषी पर्यवेक्षक बी. एस. गावडे, कृषी सहायक एन. व्ही. सोनवलकर, यू. एस. कदम, कृषी सहायक एच. पी. लांडगे, वाय. एस. जायकर, पी. के. सुतार, सुनील नाळे, नितीश घोडके, संदीप लिंभोरे, गणेश ढवळे आदी या वेळी उपस्थित होते.
जाधववाडी येथील अखिल भारतीय समन्वित कोरडवाहू फळपीक संशोधन केंद्राचे वनस्पती रोगशास्त्रज्ञ डॉ. युवराज बालगुडे यांनी अंजीर आणि सीताफळ पिकातील एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.
संशोधन केंद्रप्रमुख डॉ. प्रदीप दळवे म्हणाले, की सीताफळ आणि अंजीर या दोन्ही पिकांतून कमी उत्पादन खर्चात जास्तीत जास्त आर्थिक उत्पन्न मिळत आहे. शेतकऱ्यांनी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या जातींची लागवड करून आपली आर्थिक उन्नती साधावी असे आवाहन त्यांनी केले.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.