Tomato Cultivation : चंद्रपुरात इस्रायली तंत्रज्ञानाने बहरणार टोमॅटो

Tomato Crop : धान, कपाशी व सोयाबीन उत्पादक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात ‘आत्मा’च्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर इस्रायली तंत्रज्ञानाने टोमॅटो लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे.
Tomato
TomatoAgrowon
Published on
Updated on

Chandarpur News : धान, कपाशी व सोयाबीन उत्पादक असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात ‘आत्मा’च्या माध्यमातून प्रायोगिक तत्त्वावर इस्रायली तंत्रज्ञानाने टोमॅटो लागवडीला प्रोत्साहन देण्यात येणार आहे. त्याकरिता फळरोपवाटिका, कृषी चिकित्सालय या ठिकाणी रोपे तयार करण्याचे काम होईल, तसा ठरावही जिल्हास्तरीय शेतकरी सल्ला समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

बैठकीला आत्मा प्रकल्प संचालक प्रीती हिरळकर, उपसंचालक एन. एन. घोडमारे यांच्यासह शेतकरी प्रतीनिधींची उपस्थिती होती. चारगाव (ता. वरोरा) येथील प्रगतिशील शेतकरी मधुकर भलमे यांनी २०१८ मध्ये कृषी विभागाच्या सहकार्याने इस्राईलचा अभ्यास दौरा केला होता. या वेळी त्यांनी आपल्या सोबत त्या भागात येणाऱ्या टोमॅटोचे बियाणे आणले होते. त्याची लागवड त्यांनी आपल्या शिवारात केली.

Tomato
Tomato Farming : निर्यातयोग्य टोमॅटोची यशस्वी शेती

या टोमॅटोला लागवडीनंतर तीन महिन्यांत फळे येतात व ती सात ते आठ महिने मिळतात. या झाडाची उंची साधारणतः आठ ते दहा फूट होते. भलमे यांच्या अभ्यासाअंती ही महिती समोर आल्यानंतर जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर नाविन्यपूर्ण बाब म्हणून इस्रायली टोमॅटो लावण्यात येणार आहेत.

Tomato
Onion, Tomato Market Rate : सोयाबीन, कांदा, टोमॅटोच्या किमतींत घट

त्याकरिता भलमे यांनी रोप तयार करण्यासाठी शासकीय फळरोपवाटिका व कृषी चिकित्सालयांना इस्रायली टोमॅटोचे बियाणे निशुल्क उपलब्ध करून दिले. त्याआधारे आता रोप तयार करून तालुक्‍यातील महिला गटांना लागवडीच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना टोमॅटो उत्पादनासाठी नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. भलमे यांनी लागवड केलेल्या टोमॅटोची पाहणी चंद्रपूरचे तत्कालीन एसएओ भाऊसाहेब बऱ्हाटे यांनीही केली होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com