Nashik Flood : पूल वाहून गेल्याने पूर पाण्यातून टोमॅटो वाहतूक

निफाड व सिन्नर तालुक्याला जोडणारा सीमेवर असलेल्या सोमठाणे-ब्राह्मणवाडे शिवारातील देवनदीवरील पूल पुरात वाहून गेला. त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले.
Heavy Rainfall
Heavy RainfallAgrowom
Published on
Updated on

नाशिक : निफाड व सिन्नर तालुक्याला जोडणारा सीमेवर असलेल्या सोमठाणे-ब्राह्मणवाडे शिवारातील देव नदीवरील पूल पुरात (Nashik flood) वाहून गेला.(Heavy Rainfall) त्यामुळे जनजीवन विस्कळित झाले. येथील शेतकऱ्यांना काढणीस आलेल्या शेतीमालाची वाहतूक (Agricultural Transportation) करण्यास अडचणी येत आहेत;

Heavy Rainfall
Abdul Sattar : कृषी विद्यापीठांचे कार्य शेतकऱ्यांना संजिवनी देण्याचे

मात्र थांबेल तो शेतकरी कसला! त्यामुळे अडचणीवर मात करण्यासाठी येथील शेतकऱ्यांनी शेतीमाल बाजारात नेण्यासाठी रिकाम्या प्लॅस्टिकच्या टाक्यांचा वापर करून व त्यावर तात्पुरता सांगाडा बनवून टोमॅटो वाहून नेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच फिरत आहे.

Heavy Rainfall
Sinnar Flood : सिन्नरच्या पूरग्रस्तांबाबत सरकारचा निष्काळजीपणा

सोमठाणे-ब्राह्मणवाडे गावाच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या वस्त्या आहेत. या शेतकऱ्यांना वस्तीवर जाण्यासाठी देव नदीवर सिमेंट पाइप टाकून पूल बनविण्यात आला होता. मात्र देवनदीच्या पुरात हा पूल वाहून गेला आहे; मात्र पूल वाहून गेल्याने या शेतकऱ्यांना शेतीमाल नेण्यासाठी रस्ताच नव्हता.

Heavy Rainfall
Sharad Pawar : ‘रयत’च्या पाठीशी नगरकरांचा मजबूत पाठिंबा : शरद पवार

या भागात टोमॅटो तोडे सुरू झाल्याने माल काढून पिंपळगाव बसवंत बाजार समितीत विक्रीसाठी नेला जातो. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल वाहतुकीत अडथळे येत आहेत. त्यामुळे या अडचणीवर मात करत शेतकऱ्यांनी नामी पर्याय शोधला आहे. हा माल वाहून रोज दोन ते तीन पीक-अपमध्ये क्रेट भरून टोमॅटो नेला जात आहे.

महेश घुमरे, सागर डिके, सचिन आव्हाड, विठ्ठल घुमरे आदी शेतकऱ्यांनी प्लॅस्टिकच्या पाण्याचे दोनशे लिटरच्या दोन रिकाम्या टाक्या घेतल्या. त्यावर फॅब्रिकेशन करून सांगाडा तयार केला. दोन दोर बांधून हा पाळणा बांधून त्यावर टोमॅटो क्रेट वाहण्याचे काम महिनाभरापासून सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com