Sugarcane Crushing : देशात केवळ १७ कारखान्यांचे ऊस गाळप सुरु

Sugarcane Factory : देशात यंदा ऊस उत्पादनात घट झाली होती. गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध असल्याने यंदा कारखान्यांचे पट्टे लवकर पडले.देशात ३१ मेनंतर केवळ १७ साखर कारखाने गाळप करत होते.
 Sugarcane Crushing
Sugarcane CrushingAgrowon
Published on
Updated on

Sugarcane Crushing Season : यंदा देशातील साखर उत्पादनात मोठी घट झाली. चालू हंगामातील साखर उत्पादन ८ टक्क्यांनी कमी होऊन ३२२ लाख टनांवर स्थिरावले. गेल्या हंगामात देशात जवळपास ३५२ लाख गाट साखर उत्पादन झाले होते. देशात आता केवळ १७ साखर कारखान्यांचे गाळप सुरु आहे, अशी माहिती साखर उद्योगातील जाणकारांनी दिली.

 Sugarcane Crushing
Sugarcane Crushing : उसाचे १ लाख ४४ हजार हेक्टरवर होणार गाळप

देशात यंदा ऊस उत्पादनात घट झाली होती. गाळपासाठी कमी ऊस उपलब्ध असल्याने यंदा कारखान्यांचे पट्टे लवकर पडले. मे महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात देशातील २० साखर कारखान्यांचे गाळप बंद झाले. देशात ३१ मेनंतर केवळ १७ साखर कारखाने गाळप करत होते. त्यापैकी १० कारखाने तमिळनाडूतील होते. गेल्या हंगामाचा विचार करता ३१ मे २०२२ नंतर देशात ४५ साखर कारखान्यांचे गाळप सुरु होते. गेल्या हंगामात ऊस उत्पादन जास्त होते. त्यामुळे गाळप उशीरापर्यंत चालले.

 Sugarcane Crushing
Sugar Production : साखर उत्पादनात उत्तर प्रदेश बनला नंबर वन

देशात साखर उत्पादनात महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि कर्नाटक ही महत्वाची राज्ये आहेत. यंदा उत्तर प्रेदशात साखर उत्पादन वाढले. तर महाराष्ट्र आणि कर्नाटकातील उत्पादनात घट झाली. यंदा उत्तर प्रदेशातील उत्पादन ३ टक्क्यांनी वाढून १०५ लाख टनांवर पोचले. तर महाराष्ट्रातील उत्पादन गेल्यावर्षीच्या १४ लाख टनांवरून यंदा १० लाख ५३ हजार टनांवर स्थिरावले. कर्नाटकातील उत्पादनात ३२ हजार टनांनी घट होऊन ५ लाख ५० हजार टनांपर्यंत कमी झाले. तमिळनाडूमधील साखर उत्पादन २७ टक्क्यांनी वाढून यंदा १२ लाख टनांपर्यंत वाढले. त्यासोबत बिहार, हरियाना, पंजाब, उत्तराखंड, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील साखर उत्पादनात यंदा वाढ दिसली.

द इंडियन शुगर मिल्स असोसिएशन अर्था इस्माने देशातील साखर उत्पादनाचा अंदाज कमी केला. महाराष्ट्रातील घटलेले उत्पादन आणि उत्तर प्रदेशात वाढ झाली तरी इस्माने एप्रिल महिन्यात ३२८ लाख टनांचा अंदाज जाहीर केला. आधीचा अंदाज ३४० लाख टनांचा होता. तर देशाला २७५ लाख टनांची गरज असते.

ऊस लागवड वाढली

मागील आठवड्यात केंद्रीय कृषी विभागाने देशातील लागवडीचा अहवाल सादर केला. या अहवालात ऊस लागवड अधिक असल्याचे सरकारने स्पष्ट केले. माॅन्सून देशात अद्याप दाखल झाला नाही. मात्र ऊस लागवडीने वेग घेतला. गेल्या हंगामात २ जूनपर्यंत देशात ४६ लाख ६७ हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली होती. तर यंदा याच तारखेपर्यंत ४६ लाख ९८ हजार हेक्टरवर उसाचे पीक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com