Sugarcane Crushing : उसाचे १ लाख ४४ हजार हेक्टरवर होणार गाळप

Sugarcane Cultivation : सांगली जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून उसाच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे.
Sugar Factory
Sugar FactoryAgrowon
Published on
Updated on

Sugarcane Season : सांगली जिल्ह्यात गेल्या चार ते पाच वर्षांपासून उसाच्या क्षेत्रात वाढ होताना दिसत आहे. २०२३-२४ या गाळप हंगामात १ लाख ४४ हजार १२८ हेक्टरवरील उसाचे गाळप होणार आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गाळपासाठी २० हजार हेक्टरने क्षेत्र वाढले असून साखर कारखान्यांना ऊस तोडणीचे नियोजन काटेकोर करावे लागणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. जिल्ह्यात उसाचे क्षेत्र वाढत असल्याने सरासरी क्षेत्रात सातत्याने बदल होत आहे.

यंदाच्या गाळप हंगामात सरासरी क्षेत्र १ लाख ३७ हजार ८५२ हेक्टर असून १ लाख ४४ हजार १२८ हजार हेक्टरवर ऊस लागवड झाली आहे. वाळवा तालुक्यात सर्वाधिक उसाचे सरासरी क्षेत्र आहे. कडेगाव मिरज तालुक्याचे खालोखाल उसाचे सरासरी क्षेत्र अधिक आहे. वाळवा तालुक्यात सर्वांत जास्त आडसाली ऊस लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल दिसून येत आहे.

Sugar Factory
Sugarcane Crushing : ‘क्रांती अग्रणी’ १२ लाख टन ऊसगाळप करणार

जिल्ह्यात खासगी, सहकारी असे १८ साखर कारखाने आहेत. गेल्या हंगामात चौदा कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला. तर आटपाडी, तासगाव, खानापूर, कवठे महांकाळ या तालुक्यांतील चार कारखाने गेल्या तीन वर्षांपासून बंद होते. त्यामुळे या साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले नव्हते.

तरीदेखील यंदाच्या हंगामात ऊस क्षेत्रात वाढ झाली आहे. जत तालुक्यातील डफळापूर श्रीपती शुगर हा कारखाना नव्याने सुरू झाला आहे. यंदा गाळप सुरू करणार आहे. तर नागेवाडीचा कारखानाही सुरू होणारअसून सोळा कारखाने सुरू होतील.

तालुकानिहाय ऊस लागवड क्षेत्र

तालुका- सरासरी क्षेत्र - आडसाली- पूर्व हंगामी- सुरू- खोडवा

मिरज - १५८५० - ३४५० -३८५१ - ३१३७- ७७७१

वाळवा - ३७८४१- २१२९६- ३३३५ - ३३४- १०१००

शिराळा - १०००८ -१३२०- २२९०- २७९०- ४८३०

खानापूर - १४५४३ - ३५५० - २६५०- ४४८०- ५८७०

तासगाव - ९५२९- २८९०- १५७५- १४५०

पलूस - १४४६० - ४६२३- २२१९- १३५५

कडेगाव - १८५९२ - ७३२०- २३१४- २११६- ६८४०

आटपाडी - २७०८- ५५०- ७६९ - ८७१- १३२५

जत १०६६२ - ३१.७० - ३६८०- १७९२- ६१५२

कवठे महांकाळ - ३६५८ - २३० - १४५२ - ११८२ - २४८८

एकूण- १३७८५२- ४५२६१- २४१३७- १९५०८ - ५५२०१

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com