Chana Procurement
Chana ProcurementAgrowon

Chana Procurement : हमीभावातील हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढले

Chana Market Rate : अमरावती जिल्ह्यात उद्दिष्टपूर्ती झाल्याने ‘नाफेड’ची खरेदी बंद करण्यात आली होती.
Published on

Chana News Amravati : अमरावती जिल्ह्यात उद्दिष्टपूर्ती झाल्याने ‘नाफेड’ची खरेदी बंद करण्यात आली होती. या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केलेल्या आक्रमक आंदोलनाची दखल घेत अखेर वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे.

रब्बी हंगामातील हरभरा खरेदीसाठी केंद्र शासनाने ५३३५ रुपयांचा हमीभाव जाहीर केला आहे. दुसरीकडे बाजारात मात्र ४५०० पेक्षा कमी दराने खरेदी होत आहे.

परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत आहे. ‘नाफेड’ने हमीभावाने हरभरा खरेदीला सुरुवात केली. परंतु १९ एप्रिल रोजी अचानक उद्दिष्ट संपल्याचे सांगत ही खरेदी बंद करण्यात आली.

परिणामी, ७५ टक्‍के शेतकऱ्यांचा हरभरा घरातच पडून आहे. ‘स्वाभिमानी’ने याची दखल घेत तीव्र आंदोलन केले.

Chana Procurement
Chana MSP : एसएमएस प्राप्त शेतकऱ्यांचाच हरभरा हमीभावाने खरेदी होणार

या अंतर्गंत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांना त्यांच्याच कार्यालयात डांबण्यात आले. या आंदोलनाची दखल घेत अखेरीस जिल्ह्याला वाढीव उद्दिष्ट देण्यात आले आहे.

१ लाख १६ हजार ३६३ क्‍विंटल हरभऱ्याची खरेदी वाढीव उद्दिष्टानुसार केली जाईल. यामुळे हरभरा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

हरभरा खरेदीचे उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे सांगत ‘नाफेड’कडून खरेदी बंद करण्यात आली. मात्र त्याचवेळी ७५ टक्‍के शेतकऱ्यांचा हरभरा घरातच असल्याचा विसर यंत्रणांना पडला. परिणामी ‘स्वाभिमानी’ने हा मुद्दा लावून धरला. त्यामुळे हरभरा खरेदीचे उद्दिष्ट वाढले आहे.
अमित अढाऊ, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com