Teacher Transfer : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या बदल्याची प्रक्रिया सुरू

जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्यातील संवर्ग एकमधील बदली प्राधान्य प्रवर्गनिहाय शिक्षकांची संख्या १ हजार ३२८ इतकी असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून देण्यात आली.
Pune ZP
Pune ZPAgrowon

पुणे : जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची (ZP Teacher Transfer) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. यात पुणे जिल्ह्यातील संवर्ग एकमधील बदली प्राधान्य प्रवर्गनिहाय शिक्षकांची संख्या १ हजार ३२८ इतकी असल्याची माहिती जिल्हा परिषदेकडून (Pune ZP) देण्यात आली.

Pune ZP
Nashik ZP : निधी नियोजन बैठकीत विभागप्रमुखांची झाडाझडती

शिक्षकांच्या जिल्हाअंतर्गत बदल्यांचे सुधारित वेळापत्रक ग्रामविकास खात्याने प्रसिद्ध केले होते. त्यानुसार बदलीची प्रक्रिया सुरू असून, ती १८ फेब्रुवारीपर्यंत राहणार आहे. विशेष संवर्ग भाग एकच्या रिक्त शिक्षकांच्या पदांची यादी २९ डिसेंबरला, तर विशेष संवर्ग भाग २ ची रिक्त पदाची यादी ९ जानेवारी २०२३ ला प्रकाशित केली जाणार आहे.

Pune ZP
ZP Education : बंद पडणाऱ्या शाळेला उभारी

त्यातील संवर्ग एकमधून बदली शिक्षकांची आकडेवारी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जाहीर केली. एकूण १३२८ शिक्षक हे संवर्ग एकमध्ये येतात. यात वयाची ५३ वर्षे पूर्ण झालेल्यांची संख्या ६९७ आहे. दिव्यांग प्रवर्गातील २८० शिक्षक आहेत तसेच विधवा, घटस्फोटित, कॅन्सर, हृदयविकार, डायलिसिस असे आजार असलेल्या शिक्षकांचा समावेश संवर्ग एकमध्ये समाविष्ट आहे.

एकूण शिक्षकांची संख्या प्रसिद्ध करण्यात आली असली यातील किती जणांनी बदलीसाठी अर्ज केला आहे अथवा बदली नको, याची माहिती अद्याप संकलित नसल्याचे जिल्हा परिषदेकडून सांगण्यात आले आहे. तसेच राज्यातील जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या ऑनलाइन प्रणालीद्वारे होणाऱ्या जिल्हांतर्गत बदल्यांबाबतची कार्यवाही नव्या वेळापत्रकानुसार राबविण्यात येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com