Floriculture : ‘एलईडी’ च्या झोतात उजळली ‘शेवंती’ ची शेती

गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांची प्रयोगशीलता मात्र संपली नाही.
Floriculture
Floriculture agrowon

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून निसर्गाच्या लहरीपणामुळे (Climate Change) पिकांचे मोठे नुकसान (Crop Damage) झाले. अशा परिस्थितीतही शेतकऱ्यांची (Farmer) प्रयोगशीलता मात्र संपली नाही. दानोळी (ता. शिरोळ) येथील सुदर्शन आणि अभिजित सदलगे या बंधूंनी चक्क पावणे दोन एकर शेवंती फुलाचे शिवारच (Shevanti Flower Farm) सहाशे एलईडी दिव्यांनी उजळवले आहे. झाडांची चांगली वाढ होण्याकरिता योग्य प्रकाश मिळवण्यासाठी त्यांनी ही कल्पकता केली आहे. प्रयोग खर्चिक असला तरी नावीन्यपूर्ण आहे. सुमारे ९० हजार रुपये खर्च करून जिल्ह्यात पहिल्यांदाच कृत्रिम प्रकाशाचा हा नवा पॅटर्न सदलगे बंधूंनी आणला आहे.

Floriculture
Organic Farming : औटी परिवाराने उभारले झिरो बजेट कृषी पर्यटन केंद्र

सदलगे बंधू हे प्रयोगशील शेतकरी आहेत. त्यांच्याकडे सातत्याने फूल शेती केली जाते. साधारण जुलै-ऑगष्ट महिन्यात त्यांची लागवड केली जाते. या हंगामात लागवड केल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात फुलांचे उत्पादन सुरू होते. सदलगे बंधूनी हा हंगाम सोडून उशिरा म्हणजे ऑक्टोबर महिन्यात फुलांची लागवड केली आहे. लागवड करून एक महिना झाला आहे.

Floriculture
Crop Cover : क्रॉप कव्हरचा वापर

सध्या हंगामी पिके नुकसानीत जात असल्याचा अनुभव आहे. यामुळे आम्ही बिगर हंगामात फुले घेण्याचा प्रयत्न केला. यासाठी खर्च आला असला तरी यातून निश्चितपणे चांगले उत्पादन निघेल असा विश्वास आहे.

- अभिजित सदलगे, ९९२१३४२५४०

अशा प्रकारचे प्रयोग फूल शेती व फळबागेसाठी झाले आहेत. ऑक्टोबरमध्ये लागवड केल्यामुळे झाडांना कमी कालावधीतच कळ्या येण्यास सुरुवात होते. चांगली फुले येण्यासाठी झाडाची पूर्ण वाढ होणे गरजेचे असते. त्यासाठी लागवडीनंतर योग्य वातावरण मिळणे गरजेचे आहे. हे वातावरण मिळवण्यासाठी कृत्रिम उजेड करणे शक्य आहे. अशा प्रकाशाचा वापर करून नाईट ब्रेक(रात्र खंडित) केल्यास गरजे इतका प्रकाश देऊन झाडांची वाढ करणे शक्य आहे. यामुळे बिगर हंगामात ही फुलांची वाढ चांगली होऊ शकते.

- प्रा. संग्राम धुमाळ, फलोत्पादन विभाग प्रमुख, कृषी महाविद्यालय, कोल्हापूर

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com