Mosambi Cultivation : मोसंबीच्या लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल

Horticulture Cultivation : इंदापूर तालुक्यातील रेडा, काटी, रेडणी या गावांत सध्या शेतकरी मोसंबी बागांच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळाला असल्याचे पाहावयास मिळत आहे.
Mosambi Cultivation
Mosambi CultivationAgrowon
Published on
Updated on

Pune News : इंदापूर तालुक्यातील रेडा, काटी, रेडणी या गावांत सध्या शेतकरी मोसंबी बागांच्या लागवडीकडे मोठ्या प्रमाणात वळाला असल्याचे पाहावयास मिळत आहे. सध्या बऱ्याच शेतकऱ्यांनी मोसंबीच्या बागांच्या लागवडी केल्यामुळे दुष्काळी गाव म्हणून ओळखले जाणारे रेडा, काठी, रेडणी हे गाव मोसंबीच्या बागांचे आगार बनले असल्याचे शेतकरी बाळासाहेब सोनटक्के यांनी सांगितले.

Mosambi Cultivation
Mosambi Crop: मोसंबी बागेची तहान कशी भागवावी?

इंदापूर तालुक्यातील दुष्काळी भाग म्हणून ओळख असलेल्या काटी, रेडा, रेडणी या परिसरातील शेतकरी कमी पाण्यावर येणाऱ्या मोसंबी बागा लागवड करून आपला उदरनिर्वाह करत होता. परंतु नंतरच्या काळात डाळिंबाला चांगला दर मिळू लागल्याने शेतकरी मोसंबी बांगाकडे दुर्लक्ष करू लागला.

मात्र गेल्या दोन-तीन वर्षांपासून डाळिंब शेतीला होणारा कीटकनाशकांचा खर्च, होणारी मेहनत व रोगराई या नुकसानीमुळे डाळिंब बागा काढून शेतकरी पुन्हा मोसंबी बागांच्या लागवडीकडे वळाला असल्याचे चित्र या परिसरात पहावयास मिळत आहे.

Mosambi Cultivation
Mosambi Orchard : अनेक वर्षांपासून जोपासली मोसंबी जागेवर तयार केले ‘मार्केट’

मोसंबी बागांना लागणारे खत घरच्या घरी शेतकरी तयार करत आहेत. शेळ्या-मेंढ्यांचे मलमूत्र रोजचे रोज निर्माण होत असल्याने खताचा खर्च वाचत आहे. तसेच कीटकनाशके कमी लागत असल्याने त्यावर होणार खर्च कमी होत आहे.

मोसंबीला बाजारात चांगले दर मिळत असल्याने दुष्काळी भाग म्हणून ओळखले जाणाऱ्या बावीस गावांत सध्या मोठ्या प्रमाणात मोसंबीच्या लागवडी होत असल्याची माहिती अकलूज सहकारी साखर कारखान्याचे संचालक प्रगतिशील बागायतदार अमर काळकुटे यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com